बारामती: गंभीर गुन्ह्यासाठी बदनाम असलेल्या बारामती शहरात गुरुवारी सायंकाळी भिगवण रस्त्यावर फायरिंग झाली. (firing on Bhigwan Road). या घटनेमुळे बारामतीत खळबळ उडाली आहे. (firing in baramati). उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे यांच्यासह तालुका पोलिस ठाण्याचे अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. या गोळीबारात शहरातील तांदूळवाडी येथील एक युवक जखमी झाला आहे. उपचारासाठी त्याला बारामती येथील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. दुचाकी वरुन आलेल्या इसमांनी हा गोळीबार केल्याची प्राथमिक माहिती आहे.
शहरातील भिगवन रोडवरील रिलायन्स पेट्रोल पंपा नजिक रायझिंग महाराष्ट्र या वृत्तपत्राचे प्रतिनिधी गणेश उर्फ आकाश जाधव यांच्यावर आज संध्याकाळी प्राणघातक हल्ला झाला. यामध्ये जाधव यांच्यावर गोळीबार करण्यात आला असल्याची प्राथमिक माहिती आहे. या हल्ल्यामध्ये गणेश जाधव जखमी झाले असून त्यांच्या शरीरात मणक्याखाली गोळी लागली असल्याची प्राथमिक माहिती आहे. त्यांना अधिक उपचारार्थ शहरातील बारामती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे, बारामती तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रभाकर मोरे यांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे.
बारामती शहरातील अज्ञात हल्लेखोरांनी हा हल्ला केला असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. पेट्रोल पंपांनजीक गणेश जाधव यांच्यावर हा प्राणघातक हल्ला करण्यात आला असल्याचे समजते. यासंदर्भात उशिरापर्यंत पोलीस माहिती घेत होते. दरम्यान आकाश जाधव यांना बारामती हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.याबाबत डॉ.दिपक महाडीक यांनी बोलताना सांगितले कि, जाधव यांच्या छातीला डाव्या बाजुला लागली आहे. ती गोळी किडनीला जखम होवून ती गोळी मणक्यामध्ये अडकली आहे. या युवकाची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे डॉ.महाडीक यांनी सांगितले आहे.