पुणे: ही घटना रात्री दोन वाजता घडली. पहाटेच्या सुमारास आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन विभागाला यश आले आहे. एकूण १४ अग्निशमन वाहने घटनास्थळी दाखल झाले होते. आग अत्यंत भीषण होती. घटनास्थळाच्या बाजूलाच मॅक्स निरो हॉस्पिटल आहे. आगीच्या झळा रूग्णालयाला बसण्याची शक्यता होती. त्यामुळे रुग्णालयातील रुग्णांना वेळीच इतर ठिकाणी हलवण्यात आले. त्यापैकी, १२ जणांना महानगर पालिकेच्या वायसीएम रुग्णालयात घेऊन जाण्यात आले.
शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग: आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन विभागाकडून शर्थीचे प्रयत्न करण्यात आले. पहाटे पाचच्या सुमारास आग आटोक्यात आणण्यात त्यांना यश आले. शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग लागल्याचे सांगण्यात येत आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पिंपरी- ४, राहटणी- १, थेरगाव- १, प्राधिकरण-१, तळवडे-१, चिखली-१, भोसरी-१, खडकी कॉटेन्मेंट-१, टाटा मोटर्स-१, पीएमआरडीए मारुंजी-१, अशा एकूण १४ अग्निशमन वाहने घटनास्थळी दाखल झाली होती.
18 जानेवारीची घटना: या आगीत मोठ्या प्रमाणत दुकानांचे नुकसान झाले होते. मंगळवार पेठ, जुना बाजार येथे सकाळी ७ वाजून ३८ वाजता आग लागली होती. आगीत पत्रा व लोखंडी शेड असलेले दुमजली अंदाजे ८ ते १० दुकाने होती. या दुकानांना मोठ्या प्रमाणात आग लागली होती. अग्निशमन दलाचे ८ अग्निशमन वाहने घटनास्थळी दाखल झाले होते. त्यानंतर ८ वाजून २४ मिनिटांनी व आग आटोक्यात आणत धोका दुर करण्यात आला होता. घटनास्थळी धूर मोठ्या प्रमाणात होता. दुकानात मॅकेनिकल, इलेक्ट्रिकल व इतर साहित्य जास्त प्रमाणात होते. आगीचे कारण अद्याप समजू शकले नव्हते. जखमी व जीवितहानी झालेली नव्हती. कुलिंग करण्याचे काम सुरू होते. आग विझविण्याचे काम अग्निशमन जवानांकडून सुरू होते. अखेर विझविली असून आग नेमकी कशामुळे लागली होती याची पूर्तता झालेली नव्हती.
अब्दुल रहेमान स्ट्रीट येथील दुकानांना आग : या आधीही सात जानेवारीला अब्दुल रहेमान स्ट्रीट येथील दुकानांना आग लागली होती. अब्दुल रहमान रस्त्यावरील जुम्मा मशिदीजवळील 7 ते 8 दुकानांना रात्री 8.15 च्या सुमारास आग लागली होती. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन बचावकार्य केले होते. तसेच पोलीस, पालिका कर्मचारी, १०८ रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. अब्दुल रहमान रस्त्यावरील चार मजली इमारतीला आग लागून 7 ते 8 दुकानांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.