पुणे - येथील लोहिया नगर परिसरात भीषण आग लागली होती. त्यामुळे आसपासची 10 घरे आगीच्या भक्ष्यस्थानी सापडली होती. अग्निशमन दलाच्या आठ ते दहा ग्या घटनास्थळी दाखल होत अथक प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवले आहे.
सोमवारी (दि. 23 नोव्हेंबर) रात्री सव्वा दहा वाजण्याच्या सुमारास घोरपडे पेठ येथील लोहियानगर झोपडपट्टीत ही आगीची घटना घडली. एका सिलिंडरचा स्फोट झाला होता. त्यानंतर सुमारे 10 घरे जळाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहेत. यात एक जखमी असून आता आग आटोक्यात आली आहे. अग्निशमन दलाचे जवान कुलिंगचे (थंड) काम करत आहेत.
हेही वाचा - धक्कादायक..! बायकोचे अनैतिक संबंध लपविण्यासाठी सख्ख्या भावाचा खून, मृतदेह शेतात पुरला
हेही वाचा - बारामतीतील व्यापारी प्रितम शाह आत्महत्या प्रकरणातील आरोपींची येरवड्यात रवानगी