ETV Bharat / state

अल्पवयीन मुलीशी जबरदस्तीने विवाह; सैन्यदलातील जवानासह दोघांविरोधात गुन्हा - अल्पवयीन मुलीशी जबरदस्तीने विवाह

सैन्यदलात नोकरीला असलेल्या जवानाने बारामतीतील अल्पवयीन मुलीशी बळजबरीने विवाह केला. याप्रकरणी त्याच्यासह पीडितेचे वडील व आजीविरोधात शहर पोलिसांनी बालविवाह प्रतिबंधक अधिनियमानुसार गुन्हा दाखल केला आहे.

baramati police
बारामती पोलीस
author img

By

Published : Feb 1, 2020, 1:40 AM IST

पुणे - सैन्यदलात नोकरीला असलेल्या जवानाने बारामतीतील अल्पवयीन मुलीशी बळजबरीने विवाह केला. याप्रकरणी त्याच्यासह पीडितेचे वडील व आजीविरोधात शहर पोलिसांनी बालविवाह प्रतिबंधक अधिनियमानुसार गुन्हा दाखल केला आहे. पीडितेच्या दुसऱया फिर्यादीवरुन सैन्यदलातील या जवानाविरोधात बलात्कार तसेच बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण कायद्यानुसार अन्य एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

श्रीमंत साबू काळेल (वय ३२, रा. हर्नाळ, ता. तिकोट, जि. विजापूर, कर्नाटक) असे मुख्य आरोपीचे नाव आहे. अन्य दोन आरोपींमध्ये पीडितेचे वडील व आजी (आईची आई) यांचा समावेश आहे. यातील काळेल याला अटक करण्यात आली आहे. सैन्यदलात तो बेळगाव येथे कार्यरत असल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक अश्विनी शेंडगे यांनी दिली.

फिर्यादीत नमूद केल्यानुसार, पीडिता ही अल्पवयीन आहे, हे माहिती असतानाही त्यांनी तिच्या वडील व आजीशी संधान साधत तिच्याशी लग्नाची मागणी केली. वडील व आजीने लग्न जमवले. या लग्नाला पीडितेने व तिच्या आईने विरोध केला. परंतु, त्यांनी त्यांचे ऐकून घेतले नाही. पीडितेने आईच्या मोबाईलवरून आरोपीशी संपर्क साधत मी अवघी १५ वर्षाची असून दहावीत शिक्षण घेते आहे. मला पुढे आणखी शिकायचे आहे, तुम्ही सैन्यदलात देशाचे रक्षण करता तसे माझेही संरक्षण करा, अशी मागणी केली. परंतु, त्याने ती साफ धुडकावत २२ एप्रिल २०१९ रोजी संध्याकाळी साडेसात वाजता हर्नाळ येथील महादेव मंदिरात तिच्याशी बालविवाह केला. सैन्यदलातील आरोपी, वडील व आजीच्या दबावामुळे इच्छेविरोधात हा विवाह करावा लागला असल्याचे पीडितेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.

बलात्काराचाही स्वतंत्र गुन्हा-

दरम्यान, याप्रकरणी पीडितेने दाखल केलेल्या दुसऱया फिर्यादीनुसार आरोपी श्रीमंत साबू काळेल याच्याविरोधात बलात्कार तसेच बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियमानुसार गुन्हा दाखल केला आहे. २६ एप्रिल २०१९ ते १६ जानेवारी २०२० या कालावधीत ही घटना घडल्याचे म्हटले आहे. बालविवाह झाल्यानंतर २५ एप्रिल २०१९ रोजी हे कुटुंब बारामतीत आले. दुसऱया दिवशी २६ एप्रिल पासून ते ३ मे २०१९ पर्यंत आरोपी काळेल या फिर्यादीच्या घरीच मुक्कामी होता. त्याने फिर्यादीच्या इच्छेविरोधात तिच्याशी शरीरसंबंध केले. तिने प्रतिकाराचा प्रयत्न केला असता त्याने तिला मारहाण केली. ही बाब पीडितेने आईला सांगितल्यावर आईने त्याला समजावण्याचा प्रयत्न केला. परंतु, मी तिच्याशी लग्न केले असून ती माझी पत्नी आहे. मी तिला इथे ठेवली हे उपकार समजा. नाही तर तिला माझ्या घरी नेवून जीवे मारून टाकेन, अशी धमकी त्याने दिली. प्रचंड दबावापोटी फिर्यादी व तिची आई होती. त्यानंतर १६ जानेवारी २०२० पर्यंत त्याने तिच्या घरी येत वेळोवेळी तिच्याशी शरीरसंबंध केले. फिर्यादीने नकार दिला असता तुझी बदनामी करतो, घरादाराचे वाटोळे करतो, अशी धमकी देत तो निघून गेला. वारंवारच्या या त्रासाला कंटाळून अखेर फिर्यादीने तक्रार दाखल केली.

Intro:Body:अल्पवयीन मुलीशी जबरदस्तीने विवाह
सैन्य दलातील जवानासह दोघांविरोधात गुन्हा दाखल

बारामती- सैन्यदलात नोकरीला असलेल्या जवानाने बारामतीतील अल्पवयीन मुलीशी बळजबरीने विवाह केला. याप्रकऱणी त्याच्यासह पिडीतेचे वडील व आजीविरोधात शहर पोलिसांनी बालविवाह प्रतिबंधक अधिनियमानुसार गुन्हा दाखल केला आहे.  पिडीतेच्या दुसऱया फिर्यादीवरुन सैन्य दलातील या जवानाविरोधात बलात्कार तसेच बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण कायद्यानुसार अन्य एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
     
श्रीमंत साबू काळेल (वय ३२, रा. हर्नाळ, ता. तिकोट, जि. विजापूर, कर्नाटक) असे मुख्य आरोपीचे नाव आहे. अन्य दोन आरोपींमध्ये पिडीतेचे वडील व आजी (आईची आई) यांचा समावेश आहे. यातील काळेल याला अटक करण्यात आली आहे. सैन्यदलात तो बेळगाव येथे कार्यरत असल्याची माहिती माहिती तपास अधिकारी, सहाय्यक पोलिस निरीक्षक अश्विनी शेंडगे यांनी दिली.
    
फिर्यादीत नमूद केल्यानुसार, आरोपी काळेल हा नात्याने पिडीतेचा मावस मामा आहे. त्यांना पिडीता ही अल्पवयीन आहे, हे माहित असतानाही त्यांनी तिच्या वडील व आजीशी संधान साधत तिच्याशी लग्नाची मागणी केली. वडील व आजीने लग्न जमवले. या लग्नाला पिडीतेने व तिच्या आईने विरोध  केला. परंतु त्यांनी त्यांचे ऐकून घेतले नाही. पिडीतेने आईच्या मोबाईलवरून आरोपीशी संपर्क साधत मी अवघी १५  वर्षाची असून दहावीत शिक्षण घेते आहे. मला पुढे आणखी शिकायचे आहे, तुम्ही सैन्य दलात देशाचे रक्षण करता तसे माझेही संरक्षण करा, अशी मागणी केली. परंतु त्याने ती साफ धुडकावत २२  एप्रिल २०१९ रोजी संध्याकाळी साडे सात वाजता हर्नाळ येथील महादेव मंदिरात तिच्याशी बालविवाह केला. सैन्यदलातील आरोपी, वडील व आजीच्या दबावामुळे इच्छेविरोधात हा विवाह करावा लागला असल्याचे पिडीतेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.

------------------

बलात्काराचाही स्वतंत्र गुन्हा...

दरम्यान याप्रकरणी पिडीतेने दाखल केलेल्या दुसऱया फिर्यादीनुसार आरोपी श्रीमंत साबू काळेल याच्या विरोधात बलात्कार तसेच बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियमानुसार गुन्हा दाखल केला आहे. २६  एप्रिल २०१९  ते १६  जानेवारी २०२०  या कालावधीत ही घटना घडल्याचे म्हटले आहे. बालविवाह झाल्यानंतर २५ एप्रिल २०१९  रोजी हे कुटुंब बारामतीतील जळोची येथे आले. दुसऱया दिवशी २६  एप्रिल पासून ते ३  मे २०१९  पर्यंत आरोपी काळेल या फिर्यादीच्या घरीच मुक्कामी होता. त्याने फिर्यादीच्या इच्छेविरोधात तिच्याशी शरीरसंबंध केले. तिने प्रतिकाराचा प्रयत्न केला असता त्याने तिला मारहाण केली. ही बाब पिडीतेने आईला सांगितल्यावर आईने त्याला समजावण्याचा प्रयत्न केला. परंतु मी तिच्याशी लग्न केले असून ती माझी पत्नी आहे. मी तिला इथे ठेवली हे उपकार समजा. नाही तर तिला माझ्या घरी नेवून जीवे मारून टाकीन, असी धमकी त्याने दिली. प्रचंड दबावापोटी फिर्यादी व तिची आई होती. त्यानंतर १६ जानेवारी २०२० पर्यंत त्याने तिच्या घरी येत वेळोवेळी तिच्याशी शरीरसंबंध केले. फिर्यादीने नकार दिला असता तुझी बदनामी करतो, घरादाराचे वाटोळे करतो अशी धमकी देत तो निघून गेला. वारंवारच्या या त्रासाला कंटाळून अखेर फिर्यादीने तक्रार दाखल केली. 
-------------Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.