पुणे - विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ करून तिला तिच्या पतीने अमेरिकेतून फोनवरुन तोंडी तलाक दिल्याची घटना पिंपरी-चिंचवड शहरात उघडकीस आली आहे. या प्रकरणी पीडित महिलेने थेट देहूरोड पोलिसात धाव घेत पतीसह सासरच्या मंडळी विरोधात फिर्याद दिली आहे. त्यानुसार देहूरोड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, पीडित महिलेने तिच्या मुलाला गेली सहा महिने, भेटू न दिले असल्याचे देखील फिर्यादीमध्ये म्हटले आहे.
पती रफिक रजाक तांबोळी, सासू जमेलाबानू रजाक तांबोळी, चुलत सासरे सत्तरभाई महम्मद तांबोळी, नणंद समिना फरीद तांबोळी हे सर्व रा. देहूरोड, मेन बाजार येथील असून यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे.
2016 पासून पीडितेचा मानसिक आणि शारीरिक छळ
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादी पीडित विवाहितेचा 2016 पासून शारीरिक व मानसिक छळ केला. तसेच आरोपीने थेट अमेरिकेतून तोंडी तलाक दिला.
सहा महिन्यांपासून मुलाला भेटू दिलं नाही
पीडित विवाहितेला मागील सहा महिन्यांपासून मुलाला भेटू दिले जात नाही. तसेच विवाहितेने तिला नांदवण्यासाठी आरोपींकडे वारंवार विनंती केली. मात्र, आरोपींनी तिचा शारीरिक व मानसिक छळ केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.
भारतात तिहेरी तलाकला बंदी
भारतात तिहेरी तलाक विरोधात 1 ऑगस्ट 2019 रोजी कायदा मंजूर करण्यात आला आहे. जर भारतात तिहेरी तलाकची घटना कोठे ही घडली की, मुस्लिम महिला (विवाह हक्क संरक्षण) कायदा 2019 नुसार कारवाई करण्यात येते. तिहेरी तलाक कायदा पास होऊन एक वर्षाचा अवधी उलटला आहे. या काळात 82 टक्के तिहेरी तलाकची प्रकरणे कमी झाली असल्याचा दावा अल्पसंख्याक मंत्री अब्दुल मुख्तार नक्वी यांनी याआधी केला आहे.
हेही वाचा - लोणावळ्यातही लागणार नाईट कर्फ्यू? नाताळसह नूतन वर्षाच्या स्वागताला येणाऱ्या पर्यटकांचा होणार हिरमोड
हेही वाचा - पुणे महापालिकेत 23 गावांच्या समावेशाला मंजुरी; मुंबईपेक्षा मोठी होणार पुण्याची महापालिका