ETV Bharat / state

Kasba and Chinchwad By Poll Election: कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस; निवडणूक बिनविरोध होणार का?

भाजप आमदार लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर पोट निवडणूक होणार आहे. ही निवडणूक २६ फेब्रुवारी रोजी होणार आहे. या पोट निवडणुकीसाठी आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यातच रविवारी राज ठाकरेंनी पाठवलेल्या पत्रामुळे निवडणूक बिनविरोध होणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Kasba and Chinchwad By Poll Election
कसबा आणि चिंचवड पोटनिवडणूक
author img

By

Published : Feb 6, 2023, 7:31 AM IST

Updated : Feb 20, 2023, 7:16 PM IST

पुणे : आज भाजपकडून चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप तर कसबा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी हेमंत रासने आज उमेदवारी अर्ज भरणार आहेत. याबरोबरच कॉंग्रेसकडून रविंद्र धंगेकर यांचे अधिकृत नाव जाहीर करण्यात आले नाही. तरी कॉंग्रेसचा उमेदवार आज अर्ज भरणार आहे. राष्ट्रवादीने अद्याप चिंचवडसाठी उमेदवार जाहीर केलेला नाही. मात्र राष्ट्रवादीकडून राहुल कलाटेंचे नाव आघाडीवर आहे.

filing candidate nomination

पोटनिवडणूक बिनविरोध करण्याचे आवाहन : या निवडणुकीसाठी भाजपने आपले उमेदवार घोषित केले आहेत. महाविकास आघाडीसुद्धा ही निवडणूक लढण्याच्या पूर्ण तयारीत असल्याचे दिसत आहे. अशा परिस्थितीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रविवारी महविकास आघाडीला एक पत्र लिहिले आहे. कसबा चिंचवड पोटनिवडणूक बिनविरोध कराव्यात राज ठाकरेंनी महाविकास आघाडीला केले आवाहन केले आहे.

राज ठाकरे यांचे महाविकास आघाडीला पत्र : या पत्रात त्यांनी, महाराष्ट्र विधानसभेच्या २ आमदारांचे नुकतेच दुःखद निधन झाले. ह्या निधनामुळे रिक्त झालेल्या विधानसभा मतदारसंघांमध्ये पोटनिवडणूका पार पडत आहेत. मी अगदी सुरुवातीपासून ह्या मताचा आहे की, जेव्हा एखाद्या विद्यमान लोकप्रतिनिधीचे निधन होते, तेव्हा तिथे होणारी पोटनिवडणूक शक्यतो बिनविरोध करावी. कारण मुळात जसा त्या विधानसभेतील कौल लोकप्रतिनिधीला असतो, तसाच कौल त्याच्या पक्षाला सुद्धा असतो. अनेकदा त्या पोटनिवडणुकीत उमेदवार हा मृत व्यक्तीच्या घरातील असतो, अशा वेळेस पक्षाने जर मृत व्यक्तीच्या घरातील उमेदवार दिला असेल तर, त्या उमेदवाराला बिनविरोध निवडून देणे ही एक प्रकारे, राजकीय संस्कृतीने त्या निधन झालेल्या व्यक्तीला श्रद्धांजली ठरणार नाही का? असे मत व्यक्त केले.

महाराष्ट्राची राजकीय संस्कृती प्रगल्भ : अंधेरी पूर्व विधानसभेच्या पोटनिवडणुकीच्या वेळेस, दिवंगत आमदार रमेश लटके ह्यांच्या पत्नी शिवसेनेच्या तिकिटावर उभ्या होत्या. त्यावेळेस मी देवेंद्र फडणवीस ह्यांना निवडणूक बिनविरोध करण्याचे आवाहन केले होते. ज्यामुळे सकारात्मक प्रतिसाद मिळाला, ती निवडणूक बिनविरोध पार पडली होती. आता पुन्हा पिंपरी-चिंचवड आणि कसबा विधानसभांमध्ये पोटनिवडणूका पार पडत आहे. जो उमदेपणा भारतीय जनता पक्षाने दाखवला, तोच उमदेपणा महाविकास आघाडीच्या नेत्यांनीसुद्धा दाखवावा. महाराष्ट्राची राजकीय संस्कृती प्रगल्भ आहे. हे देशाला दाखवून देण्याची संधी आपल्याला सर्वाना आहे. हीच नाही तर एकूणच अशा दुःखद घटनांमुळे होणाऱ्या पोटनिवडणुका बिनविरोध कराव्यात ही इच्छा, अशा मजकूराचे पत्र त्यांनी महाविकास आघाडीला पाठवले होते.

हेही वाचा :Chhagan Bhujbal on Satyajeet Tambe : छगन भुजबळांचे मोठे वक्तव्य; म्हणाले, 'सत्यजित तांबे यांना काँग्रेस सोडायची असेल...'

Last Updated : Feb 20, 2023, 7:16 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.