आंबेगाव (पुणे) - तालुक्यातील खडकवाडी गावात ग्रामपंचायत निकालानंतर विजयी उमेदवारांची मिरवणूक काढून जेसीबीतून गुलाल व भंडाराची उधळण करत जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचा भंग केला. या प्रकरणी मंचर पोलीस ठाण्यात अनिल सखाराम डोके, संतोष चंदर डोके, गुलाब वाळुंज, सुभाष लहू सुक्रे यांच्यासह 15 ते 20 जणांवर 188, 135 कलामांअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात पोलिसांनी जेसीबी देखील जप्त केला आहे.
ग्रामपंचायत निवडणुक शांततेत पार पाडावी व या दरम्यान गर्दी होऊन कोरोनाचा समुह संसर्ग टाळण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी ग्रामपंचायतीच्या विजय साधेपणाने साजरा करण्याचे आवाहन केले होते. मात्र जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे अनेक ठिकाणी उल्लंघन झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.
हेही वाचा - राष्ट्रवादीची सत्ता नसलेल्या ग्रामपंचायतीसाठीही प्रामाणिकपणे निधी आणला जाईल - रोहित पवार
हेही वाचा - चर्चा तर होणारच! निवडणूक जिंकल्यानंतर कारभारीला खांद्यावर घेत कारभारणीने काढली मिरवणूक