ETV Bharat / state

बारामतीत नवरदेवासह डी.जे. चालकावर गुन्हा दाखल - Getting a DJ at a wedding

बारामती तालुक्यातील मोढवे गावात लग्नसमारंभासाठी डी.जे. लावल्या प्रकरणी वडगाव निंबाळकर पोलिसांनी नवरदेवासह डी.जे. चालकावर गुन्हा दाखल केला आहे.

Police station
पोलीस स्टेशन
author img

By

Published : Nov 28, 2020, 6:21 PM IST

बारामती - तालुक्यातील मोढवे गावात लग्नसमारंभासाठी डी.जे. लावल्याप्रकरणी वडगाव निंबाळकर पोलिसांनी नवरदेवासह डी.जे. चालकावर गुन्हा दाखल केला आहे. नवरदेव सागर गायकवाड (रा. राजपुरेवस्ती, मोढवे.ता.बारामती, सध्या रा.सर्वे नंबर १६५, पंकज पार्क माळवाडी.पुणे) व रणजित देवकुळे (रा.धनकवडी, पुणे) अशी गुन्हा दाखल झालेल्या दोघांची नावे आहेत. याप्रकरणी वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी ज्ञानेश्वर सानप यांनी फिर्याद दिली.

हेही वाचा - चित्रपट महामंडळाच्या अध्यक्षपदावरून मेघराज राजेभोसले यांची हकालपट्टी; अविश्वास ठराव मंजूर

सागर गायकवाड यांनी स्वतःच्या विवाह कार्यानिमित्त रणजित देवकुळे यांच्या मालकीचा डी.जे. लावण्यात आला होता. या डी.जे. वरून मोठ्या आवाजात गाणी वाजवली होती. तसेच या लग्नकार्यासाठी ५० ते ६० पेक्षा अधिक लोक एकत्रित येऊन कोणतेही सामाजिक अंतर न राखता कार्यक्रम साजरा करीत होते. त्यामुळे कोरोना रोगाचा संसर्ग पसरण्याचा संभव असताना निष्कळजीपणा दाखवला, असे पोलिसांनी म्हटले आहे.

हेही वाचा - 'महाराष्ट्राच्या इतिहासात असे धमकावणारे मुख्यमंत्री पाहिले नाहीत'

डी.जे. केला जप्‍त......

कोरोनासंबंधी नियमांची पायमल्ली केल्याप्रकरणी वडगाव निंबाळकर पोलिसांनी ४ साऊंड बेस, १ साऊंड टॉप, २ पॉवर ऍम्प्लिफायर, साऊंड डी.जे. मिक्सर व इतर लाईट साहित्य असा एकूण अंदाजे ४ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.