ETV Bharat / state

पिंपरीत १८ महिन्यांच्या मुलाच्या पोटात आढळला गर्भ - Pimpri Dr. D. Y. Patil Medical College Hospital News

आईच्या पोटात दोन गर्भ तयार झाले होते. त्यातील एक गर्भ दुसऱ्या गर्भाच्या शरीरात गेल्यामुळे ही स्थिती निर्माण झाली. पुढे जन्मानंतर ही बाळाच्या शरीरात ही गाठ वाढत होती. त्यामुळे बाळाला योग्य व पूर्ण पोषण मिळत नव्हते. परिणामी, त्याच्या आरोग्याच्या तक्रारी वाढत होत्या. पुढे जाऊन इतर अवयवांवर ही गंभीर परिणाम झाला असता. त्यासाठी ही गाठ शरीराबाहेर काढणे महत्त्वाचे होते. पाच लाख बालकांमधून एक अशी दुर्मिळ घटना पुढे येते. जगभरातील आकडेवारीनुसार अशी २०० प्रकरणे आजपर्यंत नोंदविलेली आहेत.

Pimpri Dr. D. Y. Patil Medical College Hospital News
१८ महिन्यांच्या मुलाच्या पोटात आढळला गर्भ
author img

By

Published : Mar 10, 2021, 2:41 PM IST

Updated : Mar 10, 2021, 4:41 PM IST

पिंपरी-चिंचवड (पुणे) - पिंपरी येथील डॉ. डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय व संशोधन केंद्र येथे एका अठरा महिन्यांच्या मुलाच्या पोटातील गर्भ शस्त्रक्रियेद्वारे बाहेर काढण्यात डॉक्टरांना यश मिळाले. मृतावस्थेतील हा गर्भ अर्धा किलो वजनाचा होता. त्याला सहा तास चाललेल्या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेद्वारे बाहेर काढण्यात आले. अशा प्रकारे अर्भकाच्या पोटात गर्भ आढळणे ही दुर्मिळ घटना असल्याचे सांगण्यात येत आहे. याला वैद्यकीय भाषेत 'फेटस इन फेटू’ (fetus in fetu) असे म्हणतात.

पिंपरीत १८ महिन्यांच्या मुलाच्या पोटात आढळला गर्भ
संबंधित कुटुंब नेपाळ येथील रहिवासी

नेपाळमधील रहिवाशी असलेल्या महिलेची अठरा महिन्यापूर्वी प्रसूती झाली होती. त्यांना मुलगा झाला. या बाळाच्या आरोग्याच्या तक्रारी दिवसेंदिवस येतच होत्या. त्याचे पोट वाढत होते. त्याच्या उपचारासाठी बाळाच्या आई-वडिलांनी पिंपरीच्या डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयात आणले होते. बालरोग विभागातील डॉ. शैलजा माने यांच्याकडे प्राथमिक तपासणी केली. बाळाच्या सर्व तपासण्या केल्यानंतर हा अविकसित मृत गर्भ त्याच्या पोटात असल्याचे निष्पन्न झाले. बाळाच्या आरोग्याबाबत त्वरित सर्व विभागाशी समन्वय साधून उपचार सुरू केले. शस्त्रक्रियेद्वारे हा गर्भ बाहेर काढण्याचे आव्हान डॉक्टरासमोर होते. या शस्त्रक्रियेत डॉक्टरांना यश मिळाले असून 18 महिन्यांच्या बाळाचे प्राण वाचले आहेत.

आईच्या पोटात होते दोन गर्भ!

'आईच्या पोटात दोन गर्भ तयार झाले होते. त्यातील एक गर्भ दुसऱ्या गर्भाच्या शरीरात गेल्यामुळे ही स्थिती निर्माण झाली. पुढे जन्मानंतर ही बाळाच्या शरीरात ही गाठ वाढत होती. त्यामुळे बाळाला योग्य व पूर्ण पोषण मिळत नव्हते. परिणामी, त्याच्या आरोग्याच्या तक्रारी वाढत होत्या. पुढे जाऊन इतर अवयवांवर ही गंभीर परिणाम झाला असता. त्यासाठी ही गाठ शरीराबाहेर काढणे महत्त्वाचे होते. पाच लाख बालकांमधून एक अशी दुर्मिळ घटना पुढे येते. जगभरातील आकडेवारीनुसार अशी २०० प्रकरणे आजपर्यंत नोंदविलेली आहेत. हा मृत गर्भ काढण्यासाठी शस्त्रक्रिया करणे अत्यंत गरजेचे होते. याची कल्पना रुग्णांच्या नातेवाईकांना दिली होती. ही केस डॉ. सुधीर माळवदे यांनी पुढील उपचारासाठी पाठवली होती, अशी माहिती डॉ. माने यांनी दिली.'

गर्भ अविकसित असून तो मृत असल्याचे तपासणीअंती निष्पन्न

रेडिओलॉजिस्ट डॉ. विकास जाधव आणि डॉ. संजय खळदकर यांनी रुग्णाची सोनोग्राफी व सी. टी. स्कॅन अहवालाचे मूल्यमापन केले. त्यानुसार, हा गर्भ बाळाच्या यकृत व उजव्या बाजूच्या मूत्राशयाच्या मधोमध होता. तो मोठ्या रक्त वाहिन्यांना चिकटलेला असल्याचे दिसून आले. हा गर्भ अविकसित असून तो मृत असल्याचे तपासणीअंती निष्पन्न झाले.

गाठ वेगळी करणे हे फार मोठे आव्हान होते

ही गाठ वेगळी करणे हे फार मोठे आव्हान बाल शल्यचिकित्सकांसमोर होते. त्याप्रमाणे बाळाच्या सर्व आरोग्य तपासण्या करून शस्त्रक्रिया करण्याचे निश्चित झाले. त्यानुसार, मोठ्या रक्तवाहिन्या, यकृत व मूत्राशय, आतडे ह्या अवयवांना कोणतीही इजा न होता ही संपूर्ण गाठ काढण्यात बाल शस्त्रक्रिया विभागाचे प्रमुख डॉ. प्रणव जाधव व त्यांच्या टीमला यश मिळाले. पुढे डॉ. जाधव म्हणाले, 'आमच्या टीममधील कुशल अनुभवी शल्यचिकित्सक व इतर तज्ज्ञांच्या मदतीने तसेच, उपलब्ध अद्ययावत तंत्रज्ञान यामुळे हे शक्य झाले.'

शस्त्रक्रिया सहा तास चालली

या प्रक्रियेत लहान बाळाला भूल देणे फारच जोखमीचे होते. भूल विभागाच्या प्रमुख डॉ. स्मिता जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली बालरोग भूलतज्ज्ञ डॉ. सोनल खटावकर यांच्या टीमने सुनियोजित भूल व्यवस्थापन करीत शस्त्रक्रियेदरम्यान व नंतर वेदनाशामक औषधे देत शस्त्रक्रिया यशस्वी होण्यात मोलाचे योगदान दिले. बाळाची आरोग्यस्थिती नियंत्रित ठेवून त्याला भूल देणे व पुन्हा भुलीतून बाहेर काढणे अत्यंत अवघड व गुंतागुंतीचे होते. ही शस्त्रक्रिया ६ तासांत पूर्ण झाली. त्यानंतर डॉ. शिल्पा बाविस्कर यांच्या देखरेखीखाली अतिदक्षता विभागात उपचार सुरू केले. या उपचारांना बाळाने सकारात्मक प्रतिसाद दिला. नंतर त्याला सामान्य वॉर्ड मध्ये उपचार देण्यात आले.

गर्भ गाठीचे वजन ५५० ग्राम असून परीक्षण मध्ये हात व पायाची बोटे, त्वचा, केस, हाडे

शरीराबाहेर काढलेल्या गर्भ गाठीचे परीक्षणाकरीता पॅथॉलॉजी विभागच्या प्रमुख डॉ. चारूशीला गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ विद्या विश्वनाथ यांच्या टीमकडे ते पाठविण्यात आले. त्याच्या सर्व तपासण्या केल्या असून गाठीपासून त्या बालकाला कोणताच धोका व दोष नसल्याचे स्पष्ट झाले. गर्भ गाठीचे वजन ५५० ग्राम असून परीक्षण मध्ये हात व पायची बोटे, त्वचा, केस, हाडे तसेच मायक्रोस्कोपमध्ये इतर ही अवयव दिसून आले. याला हे 'फेटस इन फेटू’ असल्याचे निदान झाले.

18 महिन्यांच्या बाळाचे प्राण वाचविण्यात डॉक्टरांना यश

या 18 महिन्यांच्या बाळाचे प्राण वाचविण्यात डॉक्टरांना यश मिळाले. हे बाळ आता इतर बालकांप्रमाणे सामान्य जीवन जगू शकते. त्याच्यावरील सर्व उपचार पूर्ण झाले असून त्याला आज घरी सोडण्यात आले आहे. रुग्णाच्या आई-वडिलांनी सर्वांचे आभार मानले. 'या यशस्वी शस्त्रक्रियेत सहभागी सर्वांचे बालरोग विभाग प्रमुख डॉ. शरद आगरखेडकर यांनी कौतुक केले.' ते पुढे म्हणाले, 'या यशाचा आम्हाला अभिमान असून ही शस्त्रक्रिया करून आज एक संस्थेच्या शिरपेचात मानाचा तुरा आम्ही रोवला आहे व संस्थेचा नावलौकिक वाढवला आहे. विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील, उपकुलपती डॉ. भाग्यश्री पाटील, विश्वस्त डॉ. यशराज पाटील यांनी रुग्णालयातील अद्ययावत जागतिक दर्जाच्या सेवा-सुविधा सर्व सामान्य तसेच, गरजूसाठी उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यांचे हे योगदान फारच मोलाचे आहे. त्यांच्या मार्गदर्शनामुळे व उपलब्ध सेवा सुविधांमुळे तसेच कौशल्य व अनुभवी तज्ज्ञ डॉक्टरांमुळे हे शक्य होऊ शकले.' ही शस्त्रक्रिया मोफत करण्यात आली असल्याचेही यावेळी त्यांनी नमूद केले. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अमरजित सिंग, अधिष्ठाता डॉ. जे. एस. भवाळकर, वैद्यकीय अधीक्षक डॉ. एच. एच. चव्हाण व रुग्णालयीन व्यवस्थापनाचे पाठबळही फार महत्त्वाचे होते, असे डॉ. आगरखेडकर म्हणाले.

Last Updated : Mar 10, 2021, 4:41 PM IST

For All Latest Updates

TAGGED:

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.