ETV Bharat / state

पुणे-मुंबई द्रुतगतिमार्गावर आजपासून फास्टटॅग बंधनकारक

या महामार्गावरून प्रवास करणाऱ्यापैकी बरचसे वाहनधारक फास्टटॅग वापर करतात. मात्र इतर वाहन चालकांनीही फास्टटॅग वापरावे, असे आवाहन टोल प्रशासनाकडून करण्यात येत आहे. फास्टटॅगमूळे टोल नाक्यावरील वेळ, पेट्रोल आणि डिझेलची बचत होत असल्याचे वाहनचालक आवर्जून सांगतात.

author img

By

Published : Feb 15, 2021, 11:01 AM IST

फास्टटॅग बंधनकारक
फास्टटॅग बंधनकारक

पुणे - तीन वर्षांपासून देशभरात महामार्गांवर फास्टटॅग प्रणाली लागू करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत होतं. परंतु, प्रत्येक्षात महामार्गांवर आजपासून(सोमवार) फास्टटॅग लागू करण्यात आला आहे. पुणे-मुंबई द्रुतगतिमार्गावर आजपासून फास्टटॅग बंधनकारक करण्यात आला असून फास्टटॅग नसणाऱ्या वाहनचालकांना दुप्पट टोल भरावा लागणार आहे.

आजपासून फास्टटॅग बंधनकारक
द्रुतगतिमार्गावर फास्टटॅग बंधनकारक! पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील उर्से टोल नाक्यावर मोठ्या प्रमाणावर वाहनचालक हे रोकड भरून पुणे आणि मुंबईच्या दिशेने रवाना होत आहेत. पुणे-मुंबई द्रुतगतिमार्गावर आज पासून फास्टटॅग बंधनकारक करण्यात आला आहे. दरम्यान, या महामार्गावरून प्रवास करणाऱ्यापैकी बरचसे वाहनधारक फास्टटॅग वापर करतात. मात्र इतर वाहन चालकांनीही फास्टटॅग वापरावे, असे आवाहन टोल प्रशासनाकडून करण्यात येत आहे. फास्टटॅगमूळे टोल नाक्यावरील वेळ, पेट्रोल आणि डिझेलची बचत होत असल्याचे वाहनचालक आवर्जून सांगतात.तांत्रिक अडचणी येत असल्याचा संमिश्र प्रतिक्रिया काही वाहनचालकांनी फास्टटॅग प्राणालीमुळे तांत्रिक अडचणी येऊन वेळ लागत असल्याचेही म्हटले आहे. एकूणच वाहनचालकांकडून फास्टटॅग संबंधी संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. मात्र, आजपासून फास्टटॅग बंधनकारक करण्यात आल्याने वाहनचालकांना वापरावा लागणार आहे. अन्यथा दुप्पट टोल भरवला लागणार हे मात्र नक्की...

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.