ETV Bharat / state

पीक कर्ज भरण्याची मुदत वाढली...तरीही वयोवृद्ध शेतकऱ्यांची बँकांमध्ये तोबा गर्दी - pune corona news

आपल्यामुळे इतरांच्या आरोग्याला धोका निर्माण होणार नाही यासाठी शेतकऱ्यांनी जिल्हा बँक व महाराष्ट्र बँकेत होणारी गर्दी टाळावी, असे आवाहन जिल्हा परिषद सदस्य शरद बुट्टे पाटील यांनी केले आहे. शेतकरी पुणे जिल्ह्यातील खेड, आंबेगाव, जुन्नर, शिरुर तालुक्यातील जिल्हा बँकेत पीक कर्ज भरण्यासाठी गर्दी करत आहेत.

bank pune
पीक कर्ज भरण्याची मुदत वाढली...तरीही वयोवृद्ध शेतकऱ्यांची बँकांमध्ये तोबा गर्दी
author img

By

Published : Mar 30, 2020, 1:50 PM IST

पुणे - कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. या परिस्थितीचे गांभीर्य ओळखून नागरिकांनी जिल्हा बँकेत होणारी गर्दी टाळण्याची गरज आहे. पीक कर्जावरील सवलत पुढील काळात मिळणार असल्याचे केंद्र व राज्य सरकारने जाहीर केले आहे. तरीही वयोवृद्ध शेतकऱ्यांनी बँकेच्या दारात गर्दी केली आहे.

वयोवृद्ध शेतकऱ्यांची बँकांमध्ये तोबा गर्दी

त्यामुळे आपल्यामुळे इतरांच्या आरोग्याला धोका निर्माण होणार नाही यासाठी शेतकऱ्यांनी जिल्हा बँक व महाराष्ट्र बँकेत होणारी गर्दी टाळावी, असे आवाहन जिल्हा परिषद सदस्य शरद बुट्टे पाटील यांनी केले आहे. शेतकरी पुणे जिल्ह्यातील खेड, आंबेगाव, जुन्नर, शिरुर तालुक्यातील जिल्हा बँकेत पीक कर्ज भरण्यासाठी गर्दी करत आहेत.

pune bank crowd
पीक कर्ज भरण्याची मुदत वाढली...तरीही वयोवृद्ध शेतकऱ्यांची बँकांमध्ये तोबा गर्दी

जिल्हा बँकेने पीक कर्जासाठी ३० जुनपर्यत मुदत वाढवण्यात आली आहे. मात्र, यामध्ये ३१ मार्च अखेरीस पीक कर्ज भरल्यास त्या शेतकऱ्यांना पुन्हा नव्याने तात्काळ पीक कर्ज देण्यात येणार आहे. तसेच नियमित कर्जाची ५० हजार रुपयांची सवलतही मिळणार आहे. त्यामुळे शेतकरी पीक कर्ज भरण्यासाठी जिल्हा बँकेत गर्दी करत आहेत. पीक कर्जातून वयोवृद्ध शेतकऱ्यांचा हा जीवघेणा प्रवास सुरू आहे. या गर्दीमुळे शेतकऱ्यांसह बँक कर्मचाऱ्यांच्याही जिवाशी खेळ सुरू आहे.

दरम्यान, ही बाब जिल्हा बँकेच्या व्यवस्थापनाने गांभिर्याने घेण्याची गरज आहे. जिल्हा बँकेच्या गर्दीत वयोवृद्ध शेतकरी जास्ती आहेत. सध्या कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, कोरोनाची लागण ही वयोवृद्धांना तात्काळ होत आहे. त्यातच जिल्हा बँकेत पीक कर्जाचा भरणा करण्यासाठी मोठ्या संख्येने वयोवृद्ध शेतकरी भरउन्हात रांगा लावून उभे आहेत. या गर्दीत कुठल्याही उपाययोजना केल्याचे दिसुन येत नाही.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.