ETV Bharat / state

आळंदीत वैष्णवांचा मेळावा : घंटानाद आणि फुलांची उधळण करत संजीवन समाधी सोहळा पडला पार - आळंदीत वैष्णवांचा मेळावा

Fair of Vaishnav in Alandi : ज्ञानेश्वर माऊलींचा 727 वा संजीवन समाधी सोहळा आज पुण्यातील आळंदीत झाला. (Sant Dnyaneshwar Maharaj) त्या निमित्ताने माऊलींच्या समाधी मंदिर आणि गाभाऱ्यात आकर्षक फुलांची सुंदर सजावट करण्यात आली होती. (Sanjeevan Samadhi Ceremony) घंटानाद आणि फुलांची उधळण करत संजीवन समाधी सोहळा पार पडला.

Fair of Vaishnav in Alandi
संजीवन समाधी सोहळा
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 11, 2023, 4:51 PM IST

Updated : Dec 11, 2023, 5:17 PM IST

संत ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधी सोहळ्यासाठी भाविकांची उपस्थिती

आळंदी (पुणे) Fair of Vaishnav in Alandi : संत ज्ञानेश्वर महाराजांच्या मंदिरावर करण्यात आलेल्या नेत्रदीपक विद्युत रोषणाईने भविकांचे लक्ष वेधून घेतले. आज पहाटे श्रींच्या समाधीला अभिषेक करण्यात आला. यानंतर भाविकांच्या हस्ते महापूजा, सकाळी नऊ ते बारा दरम्यान वंश परंपरेनुसार नामदास महाराजांचे काल्याचे कीर्तन, दुपारी बरोबर बारा वाजता घंटानाद आणि फुलांची उधळण करत संजीवन समाधी सोहळा पार पडला. (Pooja of Dnyaneshwar Maharaj Samadhi) इंद्रायणी काठी भक्तांचा जनसागर पाहायला मिळाला. संत ज्ञानेश्वरांनी संजीवन समाधी घेतली. त्याला यंदा बरोबर 727 वर्ष झाली. इतकी वर्ष झाली तरी लाखो लोक त्यांच्याविषयी कृतज्ञता म्हणून वर्षानुवर्षं गोळा होतात. ही साधीसुधी माणसं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येतात. ते ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधी सोहळ्याला आवर्जून उपस्थिती दर्शवितात. आनंद आणि आपत्ती दोन्ही त्यांना अडवू शकत नाही. हे निव्वळ अद्भूत म्हणावं असंच आहे. माऊलींनी फक्त आपल्याच नाही तर आपल्या पिढ्यानपिढ्यांच्या जगण्याला अर्थ दिला, अशी त्यांची भावना असते. आपल्या अस्तित्वाला माऊलींच्या विचारांमुळेच ओळख मिळाली असं त्यांना वाटतं. या सोहळ्यासाठी लाखो वारकरी आळंदीत दाखल झाले आहेत.

समाधी दर्शनासाठी उसळली भक्तांची गर्दी : गेल्या पाच दिवसांपासून आळंदीमध्ये सुरू असलेल्या सोहळ्यात संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या समाधीवर आज फुलांचा वर्षाव तसेच घंटानाद करत माऊलींना निरोप देण्यात आला आहे. यावेळी मोठ्या संख्येने वारकरी आळंदीमध्ये दाखल झाले होते. दुपारी ठीक बारा वाजता वारकऱ्यांनी फुलांचा वर्षाव करत माऊलींना मनोभावे निरोप दिला आहे. पहाटे पासूनच वारकरी मंडळींनी माऊलींच्या मंदिरात गर्दी केली होती. पहाटे माऊलींच्या समाधीला महाभिषेक करण्यात आला त्या नंतर कीर्तनाला सुरुवात करण्यात आली. दुपारी ठीक बारा वाजता मोठ्या जयघोषात संत ज्ञानेश्र्वर महाराज यांच्या समाधीवर फुलांचा वर्षाव करत घंटानाद करण्यात आला. आळंदीत दाखल झालेले वारकरी माऊलींच्या समाधीचे दर्शन घेऊन परतीचा प्रवास सुरू करतील. अवघ्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून साधारण पाच लाखांचा वारकरी वर्ग या वर्षी या सोहळ्यासाठी आला असल्याचा अंदाज सांगण्यात येत आहे.

हेही वाचा:

  1. Ashadhi wari 2023 : कोल्हापुरात अनोखे धार्मिक ऐक्य! गेल्या 32 वर्षांपासून मुस्लिम कुटुंब करत आहे दिंडीत चालणाऱ्या वारकऱ्यांची सेवा
  2. Ashadhi Wari 2023 : वारकऱ्यांच्या दिंडींचा मुक्काम थेट पोलीस स्टेशनला, 44 वर्षापासून चालू आहे परंपरा!
  3. Mumbai Ganapati Visarjan 2022 गिरगाव चौपाटीवर टाळ मृदंगाच्या गजरात बाप्पाला निरोप...

Last Updated : Dec 11, 2023, 5:17 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.