ETV Bharat / state

Sextortion News: पुण्यात सेक्स्टॉर्शनच्या जाळ्यात अडकला सॉफ्टवेअर इंजिनिअर, उकळले 7 लाख रुपये - sextortion in Pune

पुणे शहरात गेल्या काही महिन्यांपासून मोठ्या प्रमाणावर सायबर गुन्ह्यांमध्ये वाढ झाली आहे. मध्यंतरी सेक्स्टॉर्शनच्या जाळ्यात अडकून दोन तरुणांनी आपला जीव देखील गमावला होता. मागच्या वर्षभरात जवळपास सेक्स्टॉर्शनबाबत 1400 अर्ज प्राप्त झाले होते. आत्ता पुन्हा पुण्यातील सॉफ्टवेअर इंजिनिअर सेक्स्टॉर्शनच्या जाळ्यात अडकला असून त्याला 7 लाख रुपयांना गंडा घातला आहे.

Sextortion News
सेक्स्टॉर्शन
author img

By

Published : Jun 22, 2023, 2:04 PM IST

Updated : Jun 22, 2023, 2:41 PM IST

पुणे : पुण्यातील एका ३३ वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअर तरुणाला सेक्स्टॉर्शनमध्ये अडकवून त्याच्याकडून 7 लाख 14 हजार रुपये उकळल्याची घटना घडली आहे. तो आंबेगाव या भागात राहतो. या तरुणाला एका महिलेचा व्हिडीओ कॉल आला. कॉल चालू असताना तिने आपल्या अंगावरचे कपडे उतरवले. ते पाहात असल्याचे स्क्रीन शॉट या महिलेने काढले. हे स्क्रीन शॉट व व्हिडीओ त्याच्या मित्रांना पाठविण्याची तिने धमकी दिली. त्यानंतर दिल्ली सायबर कमिशन श्रीवास्तव बोलत आहे, असे त्याला फोन आले. पोलिसांना तपास करण्यासाठी पैशांची आवश्यकता आहे, अशी वेगवेगळी कारणे सांगून त्या महिलेने फिर्यादीकडून वेळोवेळी 7 लाख 14 हजार 424 रुपये उकळले आहे. शेवटी या तरुणाने पोलिसांकडे धाव घेतली असून अधिक तपास पोलीस करत आहे.

कशी होते फसवणूक : साधारणतः हा आपल्याला आपल्या व्हॉट्सॲपवर एका नंबरवरून सुंदर मुलीचे फोटो येतोत. त्यांनतर हळूहळू ओळख केली जाते. समोरून आग्रह केला जातो की, व्हिडियो कॉलवर बोलूया. त्यानंतर जेव्हा व्हिडियो कॉल केला जातो. तेव्हा समोर असलेली मुलगी न्यूड होते. ती आपल्याला ही न्यूड होण्याबाबत आग्रह करते. चेहरा कॅप्चर करण्यासाठी दोन मिनिटांचा व्हिडियो कॉल केला जातो. लगेच व्हॉट्सॲपवर त्या व्हिडियो कॉलचा व्हिडियो येतो. तेथून धमक्यांना सुरवात होते. पहिल्यांदा अशी धमकी दिली जाते की जर आपण पैसे नाही दिले तर मी तक्रार दाखल करेल, अन्यथा सोशल मीडियावर व्हायरल करेल. याच धमकीला तरुण बळी पडतात, पैसे देतात. जर पैसे दिले गेले नाही तर सोशल मीडियावर व्हायरल केले जातील. बदनामी होऊ नये म्हणून तरुण टोकाचे पाऊल उचलतात.

मागच्या वर्षभरात सेक्सटॉर्शनचे 1400 अर्ज : पुणे सायबर पोलिसांकडे सेक्सटॉर्शनचे 1400 हून अधिक अर्ज आले आहेत. पोलीस याचा तपास करत आहे. आमच्याकडे अर्ज घेऊन आलेल्या व्यक्तीकडून पूर्ण माहिती घेतली जाते. त्याला समजावून सांगितले जाते की, कोणत्याही प्रकारचे पैसे भरू नये. पॅनिक होऊ नये. कोणतेही टोकाचे पाऊल उचलू नये. जर अर्जदाराने पैसे भरले असेल तर बँक डिटेल घेऊन तशी चौकशी केली जाते. तसेच व्हॉट्सॲप वरून माहिती घेऊन पुढील तपास केला जात आहे.

पोलिसांकडून आवाहन : पुणे पोलिसांकडून आवाहन करण्यात येत आहे की, अनोळखी व्यक्ती जर कोणीही व्हॉट्सॲप किंवा सोशल मीडियावरून बोलत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करावे. तसेच जर संशय आला तर लगेच संबंधित अनोळखी व्यक्तीला ब्लॉक करा. तसेच घाबरून जाऊ नका. कोणीही अधिकृत सोशल मीडियावर तुमचे व्हिडियो व्हायरल करू शकत नाही. तसेच जर कोणीही धमक्या दिल्या तर तात्काळ संबंधित पोलीस स्टेशन किंवा सायबर पोलीस स्टेशन येथे येऊन तक्रार दाखल करा. कोणीही टोकाचे पाऊल उचलू नका, असे आवाहन देखील पोलिसांकडून करण्यात आले आहे.

दत्तवाडीमध्ये पहिली आत्महत्या : पुण्यातील दत्तवाडी भागात राहणाऱ्या 19 वर्षीय शंतनू वाडकर या तरुणाची प्रीत यादव या तरुणीसोबत इन्स्टाग्रामवर ओळख झाली. दोघांमध्ये ओळख झाल्यावर त्याने तिला अर्धनग्न फोटो पाठवले. त्यानंतर त्या तरुणीने पैसे दे अन्यथा सोशल मीडियावर फोटो व्हायरल करेल, अशी धमकी दिली. या सततच्या त्रासाला कंटाळून या 19 वर्षीय शंतनू वाडकर या तरुणाने इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली.

धनकवडी परिसरात अशीच घटना : पुण्यातील धनकवडी येथे अशीच घटना ३० सप्टेंबर रोजी घडली होती. ऑनलाइन ओळख झालेल्या तरुणीने तरुणाचा नग्नावस्थेतील व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड करण्याची धमकी देत सातत्याने खंडणीची मागणी केल्याने अमोल राजू गायकवाड या तरुणाने आत्महत्या केली होती. त्या महिलेने त्याच्याकडे पैशांची मागणी करून वेळोवेळी पैसे घेऊन मानसिक त्रास देण्यास सुरुवात केली होती.

हेही वाचा :

  1. Cyber Crime : सेक्सटॉर्शननंतर सायबर चोरट्यांच्या रडारवर राजकीय व्यक्ती; धमक्यांचे प्रमाण वाढले
  2. Pune Crime : अश्लील व्हिडिओ कॉल करून आमदारालाच फसविले सेक्सटॉर्शनच्या जाळ्यात; आरोपीस राजस्थानातून अटक
  3. Pune cops nab sextortion case : केवळ 2200 लोकांच गाव सेक्सटॉर्शनं गाजलं, आरोपीला रायपूर सुकेती येथुन अटक

Last Updated : Jun 22, 2023, 2:41 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.