ETV Bharat / state

चाकण मराठा आंदोलनातील हिंसाचार प्रकरणाचा तपास दिशाहीन, माजी आमदार दिलीप मोहितेंचा आरोप

चाकण मराठा आंदोलन हिंसाचार प्रकरणाचा तपास पूर्ण झाला आहे. या प्रकरणातील मुख्य सूत्रधाराला लवकरच अटक करणार असल्याची माहिती पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांनी दिली आहे.

माजी आमदार दिलीप मोहिते
author img

By

Published : Jul 17, 2019, 9:04 AM IST

Updated : Jul 17, 2019, 11:51 AM IST

पुणे - मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने मागील वर्षी चाकणमध्ये पुकारलेल्या आंदोलनानंतर मोठा हिंसाचार घडला होता. त्या प्रकरणाची चौकशी पूर्ण झाल्याचा दावा करत पोलिसांनी आता पुन्हा एकदा अटक सत्र सुरू केले आहे. मात्र, पोलिसांकडून केला गेलेला तपास दिशाहीन असल्याचा आरोप माजी आमदार दिलीप मोहिते-पाटील यांनी केला आहे. एवढेच नाही, तर पोलिसांच्या तपासाविरोधात चाकण परिसरातील ठिक-ठिकाणी निषेध सभाही घेतल्या जात आहेत. यामुळे चाकणमध्ये पुन्हा एकदा तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे.

चाकणमध्ये घडलेल्या हिंसाचारात संतप्त जमावाने केलेल्या दगडफेकीत कोट्यवधी रुपयांचे सार्वजनिक नुकसान झाले होते. काही दिवसानंतर दंगलीचे वातावरण शांत झाले आणि पोलिसांनी या घटनेप्रकरणी सुमारे पाच हजार नागरिकांविरोधात गुन्हे दाखल केले, मात्र ही घटना केवळ मराठा समाजाचा उद्रेक नव्हता तर नियोजित कट करून हा हिंसाचार घडविल्या गेल्याचा संशय आल्याने विशेष तपास पथक नेमून या घटनेची चोकशी केली गेली. आता हा तपास पूर्ण झाला असून चाकण हिंसाचार प्रकरणातील मुख्यसूत्रधाराला लवकरच अटक करणार असल्याची माहिती पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांनी दिली आहे.

चाकण मराठा आंदोलनातील हिंसाचार प्रकरणाचा तपास दिशाहीन, माजी आमदार दिलीप मोहितेंचा आरोप

पोलीस आयुक्त पद्मनाभन यांनी ही माहिती देताना मुख्यसूत्रधाराचे नाव घेणे टाळले आहे. मात्र, त्याच वेळी खेड विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे माजी आमदार दिलीप मोहिते-पाटील यांच्या घराबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात केला आहे. तेव्हा चाकण दंगलीचा मुख्यसूत्रधार म्हणून पोलीस दिलीप मोहितेंना अटक करणार, अशी चर्चा परिसरात पसरल्याने मराठा समाजातील अनेक नेत्यांनी पोलिसांच्या तपासा विरोधात ठिक-ठिकाणी निषेध सभा घ्यायला सुरुवात केली आहे. स्वतः मोहिते-पाटील यांनीही पोलीस राजकीय द्वेशाला बळी पडून चुकीच्या पद्धतीने आपल्याला या प्रकरणात गुंतवत आसल्याचा धक्कादायक आरोप केला आहे.

याप्रकरणी दिलीप मोहिते-पाटील यांनी न्यायालयात धाव घेतली आहे. तर मराठा समाजातील अनेक नेत्यांनी पिंपरी चिंचवड पोलिसांनी केलेल्या तपासाविरोधात आंदोलन करण्याचा इशारा दिल्याने, हे प्रकरण आणखीच चिघळताना दिसत आहे. यामुळे मराठा समाजाच्या रोषाला सरकार आणि पोलिसांना पुन्हा एकदा सामोरं जावं लागेल का, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

Intro:Anc_मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने मागील वर्षी चाकण मध्ये  पुकारलेल्या आंदोलनानंतर मोठा हिंसाचार घडला होता, त्या प्रकरणाची चोकशी पूर्ण झाल्याचा दावा करत पोलिसांनी आता पुन्हा एकदा अटक सत्राला सुरवात केलीय,मात्र पोलिसांकडून केला गेलेला तपास दिशाहीन असल्याचा आरोप करत, त्या विरोधात चाकण परिसरातील ठीक ठिकाणी निषेध सभा घेतल्या जातायत. ज्यामुळे चाकण मध्ये पुन्हा एकदा तणावाची परिस्थिती निर्माण झालीय  

VO- 30 जुलै 2018 ,चाकण मध्ये घडलेल्या हिंसाचारात संतप्त जमावाने केलेल्या दगडफेकीत करोडो रुपयांच्या सार्वजनिक मालमत्तेच नुकसान झालं होतं,काही दिवसानंतर दंगलीचं वातावरण शांत झाले आणि पोलिसांनी ह्या घटनेप्रकरणी सुमारे पाच हजार नागरिकांविरोधात गुन्हे दाखल केले, मात्र ही घटना केवळ मराठा समाजाचा उद्रेक नव्हता तर नियोजित कट करून हा हिंसाचार घडविल्या गेल्याचा संशय आल्याने विशेष तपास पथक नेमून ह्या घटनेची चोकशी केल्या गेली आणि आता हा तपास पूर्ण झाला असून चाकण हिंसाचार प्रकरणाचा  मुख्यसूत्रधार लवकरच अटक करणार असल्याची माहिती पोलीस आयुक्त आर के पद्मनाभन ह्यांनी दिली आहे

BYET- पोलीस आयुक्त -आर .के .पद्मनाभन 

VO- मात्र पोलीस आयुक्त पदमनाभन ह्यांनी अशी  माहिती मुख्यसूत्रधाराच नाव घेणं टाळलं आहे मात्र त्याच वेळी खेड विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादीचे माजी आमदार दिलीप मोहिते यांच्या घराबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात केला आहे तेव्हा चाकण दंगलीचा मुख्यसूत्रधार म्हणून पोलीस   दिलीप मोहितेना अटक करणार अशी चर्चा परिसरात पसरल्याने मराठा समाजातील अनेक नेत्यांनी पोलिसांच्या तपासा विरोधात ठीक ठिकाणी निषेध सभा घ्यायला सुरुवात केलीय, स्वतः मोहिते पाटील ह्यांनीही पोलीस राजकिय द्वेशाला बळी पडुन चुकीच्या पद्धतीने आपल्याला या प्रकरणात गुंतवत आसल्याचा धक्कादायक आरोप केला आहे

BYET- दिलीप मोहिते पाटील- माजी आमदार

Byte_रघुनाथ चित्रे-पाटील- मराठा क्रांती मोर्चा समन्वयक

दरम्यान या प्रकरणी दिलीप मोहिते यांनी न्यायालयात धाव घेतली आहे ,तर मराठा समाजातील अनेक नेत्यांनी पिंपरी चिंचवड पोलिसांनी केलेल्या तपासा विरोधात आंदोलन करण्याचा ईशारा दिल्याने, हे प्रकरण आणखीच चिघळतांना दिसत असल्याने मराठा समाजाच्या रोषाला सरकार आणि पोलिसांना पुन्हा एकदा सामोरं जावं लागेल का अशी  परिस्थिती निर्माण झाली आहेBody:...Conclusion:
Last Updated : Jul 17, 2019, 11:51 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.