पुणे : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दोन दिवसाच्या पुणे दौऱ्यावर आहे. त्यामुळे पुण्याकडे चोख सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. असे असताना देखील शाहांच्या ताफ्यात एका अज्ञात व्यक्तीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जवळचा आहे म्हणून प्रवेश केलेला आहे. त्यामुळे केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या सुरक्षा व्यवस्थेमध्ये तुटी राहिल्याचे दिसून आले आहे. त्या व्यक्तीला पुणे पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, श्रीकांत शिंदे यांच्या जवळचा असल्याचे या व्यक्तीने पोलिसांना सांगितले होते. पोलिसांच्या वेळीच ही गोष्ट लक्षात आल्याने त्याला ताब्यात घेण्यात आले आहे.
सोमेश धुमाळला अटक : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे यांच्या जवळचा असल्याचा दावा करत केंद्रीय मंत्री अमित शाहा यांच्या ताफ्यात घुसलेल्या एका व्यक्तीला पुणे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सोमेश धुमाळ असे या संशयिताचे नाव आहे. त्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या जवळचा असल्याचे पोलिसांना सांगुन अमित शाहांजवळ जाण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पोलिसांनी त्याला तात्काळ ताब्यात घेतले.
अमित शाह पुण्यात - विविध कार्यक्रमानिमित शाहा हे पुण्यात आहेत. तेव्हा सोमेश धुमाळ याने आपण मुख्यमंत्री आणि खासदार शिंदे यांच्याजवळचा व्यक्ती असल्याचे सांगून एका पोलीस अधिकाऱ्यासोबत गेला. स्थानिक पोलिसांना चकवा देणारा सोमेश धुमाळ मात्र शाहांसोबत असलेल्या पोलीस यंत्रणेच्या नजरेतून सुटला नाही. माग काढत अखेर स्थानिक पोलिसांनी त्याला गाठले. तो मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे जाणार असल्याचे माहिती असलेल्या पो्लिसांनी सोमेशला लगेच ताब्यात घेऊन पुढील चौकशीसाठी पोलीस ठाण्यात नेले. ही व्यक्ती कोण आहे? ती कोणाचया वाहनांत बसला, याचा शोध पोलिस घेत आहेत. या व्यक्तीचे काही फोटो सोशल मीडियावरसुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत दिसत आहे. त्यामुळे हा व्यक्ती नेमका कोण आहे याचा शोध आता पोलीस घेत आहेत.
कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला : केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांच्या दौऱ्याने भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांसह भाजप कार्यकर्त्यांचा उत्साह सिगेला पोहचला आहे. आगामी काळात लोकसभा, विधानसभा, मुंबई, नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुका होणार आहे. त्या दृष्टीने अमित शहा यांचा हा दोन दिवसांचा दौरा महत्त्वाचा आहे. पदवीधर, शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपचा दारूण पराभव झाला होता. त्यामुळे कार्यकर्त्यांचा उत्साह मावळला होता. मात्र, अमित शहा यांच्या दौऱ्यामुळे कार्यकर्ते कामाला लागतील, अशी आशा भाजप नेत्यांनी व्यक्त केली आहे.
राज्यघटनेत लोकशाहीचे मूल्य : आज सकाळी अमित शाह यांनी दीक्षाभूमी स्मारकाला आज दुसऱ्यांदा भेट दिली. यावेळी अमित शाह यांनी दीक्षाभूमीच्या नोंदवहीत अभिप्राय लिहला आहे. दीक्षाभूमी स्मारकाला आज दुसऱ्यांदा भेट देण्याचे भाग्य मला लाभले. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक केवळ भारतीयांसाठीच नाही तर जगातील दलित, शोषित आणि मागासवर्गीयांसाठी प्रेरणादायी आहे. बाबासाहेबांनी आपल्या राज्यघटनेत लोकशाहीचे मूल्य, तत्त्व समाविष्ट करून भारताचे संविधान अतुलनीय केले आहे. असा अभिप्राय त्यांनी नोंदवला आहे.