पुणे(बारामती) - पुणे जिल्ह्यातील बारामती उपविभागातील बारामती, इंदापूर, दौंड, पुरंदर तालुक्यात भौगोलिकदृष्ट्या पर्जन्य काळात अत्यल्प पाऊस पडतो. या चारही तालुक्यातील शेतकऱ्यांना नदी, कालवे व विहिरींच्या पाण्याच्या भरवशावरच शेती पिकवावी लागते. मात्र, केंद्र सरकारने प्रधानमंत्री सिंचन योजना कार्यान्वित केल्यामुळे बारामती उपविभागातील ३६ हजार शेतकऱ्यांना त्याचा लाभ झाला असून २४ हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आले आहे.
- अल्प व अत्यल्प भूधारक शेतकरी - ५५ टक्के
- इतर शेतकरी ४५ टक्के
प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेचा आलेख -
तालुका | शेतकरी | सिंचन क्षेत्र (हेक्टर) |
बारामती | ११ हजार ८६१ | ७ हजार ९७६.७२ |
दौंड | ६ हजार ४४२ | ४ हजार २८८.२१ |
इंदापूर | १४ हजार ३८२ | १० हजार १६.४१ |
सासवड | ३ हजार ४७७ | १ हजार ९३०.९७ |
- जास्तीत-जास्त शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा -
बारामती उपविभागातील बारामती, इंदापूर, दौंड, सासवड या तालुक्यातील ३६ हजार शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ झाला असून २४ हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आले आहे. या कृषी सिंचन योजनेचा अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना ५५ टक्के व इतर शेतकऱ्यांना ४५ टक्के अनुदानाचा लाभ मिळत आहे. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे, आवाहन बारामतीचे उपविभागीय अधिकारी बालाजी ताटे यांनी केले आहे.
सिंचन योजनेची उद्दिष्ट्ये - - आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून सुक्ष्म सिंचनाखाली क्षेत्रात वाढ करणे.
- जल वापर कार्यक्षमतेत वाढ करणे.
- कृषीउत्पन्नासह शेतकऱ्यांच्या एकूण उत्पन्नात वाढ करणे.
- कुशल व अर्धकुशल बेरोजगारांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करणे.
- समन्वयीत पद्धतीने विविध योजनांची अंमलबजावणी करणे.