ETV Bharat / state

पुण्यातून २० कोटींचे अमली पदार्थ जप्त, पाच जणांना अटक; अमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई - पुणे २० किलो अमली पदार्थ जप्त

खेड तालुक्यातील शेलपिंपळगाव येथे एवढ्या मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ आणण्यात येणार असल्याची माहिती पथकाला मिळाली होती. त्यानुसार सापळा रचत पथकाने चाकण-शिक्रापुर रोडवरील दशमेश ढाब्याजवळ एम. एच. 12 एमएस 4716 या क्रमांकाच्या गाडीमधून आलेल्या पाच जणांना ताब्यात घेतले...

Drugs worth 20 crore seized by Anti Drugs squad in Pune
पुण्यातून २० कोटींचे अमली पदार्थ जप्त, पाच जणांना अटक; अमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई
author img

By

Published : Oct 8, 2020, 9:56 AM IST

पुणे : खेड तालुक्यातील शेलपिंपळगाव येथे अमली पदार्थ विरोधी पथकाने तब्बल 20 किलो अमली पदार्थ जप्त केले आहेत. नोएडावरून हे अमली पदार्थ राज्यात विक्रीसाठी आणण्यात आले होते. या कारवाईदरम्यान पाच जणांना अटक करण्यात आली आहे. चेतन दंडवते (28), आनंदगिर गोसावी (25), अक्षय काळे (25), संजीवकुमार राऊत (44) आणि तौसिप हसन महम्मद तस्लिम (31) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहे.

खेड तालुक्यातील शेलपिंपळगाव येथे एवढ्या मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ आणण्यात येणार असल्याची माहिती पथकाला मिळाली होती. त्यानुसार सापळा रचत पथकाने चाकण-शिक्रापुर रोडवरील दशमेश ढाब्याजवळ एम. एच. 12 एमएस 4716 या क्रमांकाच्या गाडीमधून आलेल्या पाच जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून २० किलो अमली पदार्थ जप्त केले आहेत. या पदार्थांची एकूण किंमत २० कोटींच्या घरात असल्याची माहिती अमली पदार्थ विरोधी पथकाने दिली आहे.

यावेळी अटक करण्यात आलेले तीन तरुण स्थानिक आहेत तर दोघे नोएडाचे आहेत. त्यामुळे या प्रकरणात अजूनही मोठी साखळी समोर येण्याची शक्यता असल्याचे पथकाचे म्हणणे आहे. त्यादृष्टीने अधिक तपास सुरू आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.