ETV Bharat / state

DRDO : कर्मचाऱ्यांनी अनोळखी नंबरवरून आलेले कॉल स्वीकारू नये, डीआरडीओचे निर्देश - DRDO scientist Pradeep Kurulkar

डीआरडीओचे शास्त्रज्ञ प्रदीप कुरुलकर यांना गुप्त माहिती लीक केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. ही बाब उघडकीस आल्यानंतर डीआरडीओने आपल्या कर्मचाऱ्यांना अनोळखी नंबरवरून कॉल न घेण्याच्या सुचना दिल्या आहेत.

DRDO
DRDO
author img

By

Published : May 21, 2023, 10:34 PM IST

पुणे : संरक्षण संशोधन आणि विकास संघटनाने (DRDO) आपल्या कर्मचार्‍यांना अनोळखी नंबरवरून कॉल उचलू नये असा सक्त सल्ला दिला आहे. यासोबतच त्यांना सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर टाळण्यासही सांगण्यात आले आहे. शत्रूच्या हेरांना संवेदनशील माहिती लीक केल्याच्या आरोपाखाली ज्येष्ठ शास्त्रज्ञ प्रदीप कुरुलकर यांना अटक करण्यात आल्यानंतर ही बाब समोर आली आहे.

अनोळखी फोन आल्यास न उचलण्याच्या सुचना : डीआरडीओच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, 'आम्ही सायबर घटनेला आळा घालण्यासाठी आमच्या कर्मचाऱ्यांना अनोळखी फोन आल्यास न उचलण्याच्या सुचना केल्या आहेत. 'ज्येष्ठ शास्त्रज्ञ प्रदीप कुरुळकर यांच्या अटकेनंतर आम्ही आमच्या सर्व कर्मचाऱ्यांना अनोळखी नंबर किंवा परदेशी नंबरवरून कॉल मिळणे यासारख्या सायबर शिस्त पाळण्याच्या कडक सूचना दिल्या आहेत.

इंटरनेट वापरताना जबाबदारीने वापरा : कर्मचाऱ्यांना सोशल मीडियाचा वापर देखील टाळण्यास सांगण्यात आले आहे. कारण यामुळे अनोळखी लोकांशी मैत्री होण्याची शक्याता नाकारता येत नाही. त्यामुळे हा सल्ला देण्यात आला आहे. एखादी व्यक्ती अशा विरोधी आपला बळी होऊ शकते. डीआरडीओ प्रमुख डॉ. समीर. व्ही कामत यांनी हा आदेश जारी केला आहे. संरक्षण संशोधन संस्थेतील प्रत्येकाने इंटरनेट वापरताना जबाबदारीने वागले पाहिजे अशा देखील सुचना देण्यात आल्या आहेत.

अधिकाऱ्यांना अडकवण्याचा प्रयत्न : सोशल मीडिया, इतर अ‍ॅप्सवर सर्व कर्मचाऱ्यांची पुरेशी माहिती असली पाहिजे. कारण असे अनेक ऑपरेटर देशाबाहेरील व्हॉट्सअ‍ॅप नंबर वापरून वैयक्तिक अधिकाऱ्यांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न करत आहेत. 3 मे रोजी, महाराष्ट्राच्या दहशतवादविरोधी पथकाने DRDO चे सर्वोच्च शास्त्रज्ञ प्रदीप कुरुलकर यांना व्हर्च्युअल हनी ट्रॅपरला संवेदनशील माहिती लीक केल्याच्या आरोपाखाली अटक केली. त्यांच्यावर पाकिस्तानी गुप्तचर अधिकाऱ्यांना माहिती पुरवल्याचा आरोप आहे. गेल्या वर्षी, ते सोशल मीडियावर मित्र असलेल्या एका महिलेच्या हनी ट्रॅपमध्ये अडकले होते. कुरुलकर यांनी माहिती लीक केल्याचे प्रथमदर्शनी आढळून आले आहे. त्यांना पुण्यातील प्रयोगशाळेच्या संचालक पदावरून हटवण्यात आले आहे.

हेही वाचा -

  1. BMC Election : 'मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना ५० चा आकडाही पार करू शकणार नाही'
  2. Arvind Kejriwal : केजरीवाल मुंबईत घेणार शरद पवार, उद्धव ठाकरेंची भेट, केंद्राच्या 'या' अध्यादेशाविरोधात समर्थन मागणार
  3. Pandharpur Vari : पंढरपूर वारीची शंभर वर्षांपासून परंपरा; अमरावतीच्या नारायण गुरु मठातून 1924 पासून निघते पालखी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.