पुणे : डीआरडीओचे संचालक प्रदीप कुरुलकर यांच्या अडचणींमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यांच्याबाबतील तपासात अनेक नवीन गोष्टी समोर येत आहे. आत्ता एटीएसला कुरुलकर यांची पोलिग्राफ टेस्ट घेण्याची परवानगी मिळाली आहे. येत्या दोन दिवसांत ही टेस्ट केली जाणार असल्याचे सांगितल जात आहे. तसेच पोलिग्राफ टेस्टनंतरही जर कुरुलकर यांनी तोंड उघडले नाही. तर त्यांची नार्को टेस्टदेखील घेण्याची तयारी एटीएसने केली असल्याचे सांगितले जात आहे.
एक दिवसाची एटीएस कोठडी : डीआरडीओचे संचालक प्रदीप कुरुलकर हे चार ते पाच मोबाईल वापरत होते. त्यापैकी एका मोबाईलमध्ये संरक्षण दलाची चित्रे डॉक्युमेंट्स, व्हिडिओ, ऑडिओ, इन्स्टंट मॅसेजेस, महिलांचे अर्धनग्न फोटोज मिळून आले आहे. आज कुरुलकर यांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. अनेक बाबी आज न्यायालयात समोर येण्याची शक्यता आहे. सोमवारी प्रदीप कुरुलकर यांना न्यायालयात हजर करण्यात आले होते, यावेळी सरकारी वकील यांनी न्यायालयात सांगितले की, कुरुलकर यांच्याकडे 4 ते 5 मोबाईल फोन होते. त्यातील वन प्लस 6 टी हा मोबाईल फोन फॉरेन्सिक रिपोर्टसाठी देण्यात आला होता. तपास करण्यासाठी कुरुलकर यांनीच एटीएस अधिकाऱ्यांच्या समोर हा फोन ओपन करून दिला आहे. आत्ता त्याचा अधिक तपास करण्यासाठी एक दिवसाची पोलीस कोठडी देण्यात यावी, असे सरकारी वकिलांकडून सांगितले गेले. याच्या तपासासाठी कुरुलकर यांना एक दिवसाची एटीएस कोठडी देण्यात आली आहे.
एअर फोर्सच्या अधिकाऱ्याला फोन : तपासात अजून एक बाब समोर आली आहे, ज्यात बेंगलोर येथील एअर फोर्स येथील अधिकारी निखिल शेंडे यांना देखील सेम पाकिस्तानी आयपी ऍड्रेसवरून कॉल आला होता. ज्या नंबरने कुरुलकर यांना कॉल आला होता. त्याच नंबरने निखिल शेंडे यांना देखील कॉल आल्याचा समोर आला आहे. आत्ता निखिल शेंडे यांचा देखील जवाब घेण्यात आला आहे. एअर फोर्सच्या चौकशी समितीकडून त्यांची चौकशी केली जात आहे.
डीआरडीओच्या गेस्ट हाऊसचा वापर : विशेष म्हणजे झारा दास गुप्ता ही महिला दोन अधिकाऱ्यांशी बोलत होती. एक म्हणजे कुरुलकर आणि दुसरे म्हणजे एअर फोर्स येथील अधिकारी निखिल शेंडे हे आहे. पण यात अजून एक माहिती समोर आली आहे की, झारा दास गुप्ता ही महिला दोघांशी बोलत असताना दोघांना ही माहीत नव्हते की, ती कोणाशी बोलत आहे. याचा तपास देखील आत्ता करण्यात येत आहे. आज न्यायालयात अजून एक बाब समोर आली आहे. ज्यात आरोपी कुरुलकर यांनी मुंबईच्या डीआरडीओच्या गेस्ट हाऊसचा देखील वापर केला आहे. हा वापर का केला आहे? याचा देखील आत्ता तपास करण्यात येणार आहे.