ETV Bharat / state

बारामतीत पिसाळलेल्या कुत्र्याचा सुळसुळाट, 19 जणांचा घेतला चावा - उपजिल्हा रुग्णालय

मोकाट कुत्र्याचा बारामती शहरातील प्रगतीनगर परिसरात सुळसुळाट झाला असून एकोणीस जणांना चावा घेतला आहे.

व्यक्तीचा चावा घेताना
author img

By

Published : Nov 5, 2019, 8:29 PM IST

पुणे - मोकाट कुत्र्याचा बारामती शहरातील प्रगतीनगर परिसरात सुळसुळाट झाला असून एकोणीस जणांना चावा घेतला असल्याची घटना घडली. चावा घेतलेल्या जखमींना उपचारासाठी नागरिकांनी तातडीने जिल्हा उपरुग्णालयात दाखल केले आहे.

व्यक्तीचा चावा घेताना सीसीटीव्हीत कैद
बारामतीत काही दिवसांपासून मोकाट कुत्र्यांचा उपद्रव वाढत आहे. मएसो शाळेच्या आवारात प्रवेश करून पिसाळलेल्या मोकाट कुत्र्याने एका विद्यार्थिनीच्या दंडाला चावा घेतला. तर दोन दिवसात तब्बल 19 जणांना चावा घेतल्याची माहिती उपजिल्हा रुग्णालय प्रशासनाने दिली आहे. यामध्ये 14 नागरिकांवर उपचार सुरू आहेत. तर पाच रुग्णांनी खासगी रुग्णालयात उपचार घेतले आहे.

प्रगतीनगर परिसरात पिसाळलेल्या कुत्र्याने फिरायला निघालेल्या अनेक नागरिकांना चावा घेतला आहे. माळावरच्या देवीच्या मंदिराजवळ राहणाऱ्या अनंत पाटील यांना पायाला व हाताला चावा घेतला आहे. मएसो शाळेचे सुरक्षा रक्षक दत्तात्रय शिंदे यांच्या हाताला कुत्र्याने चावा घेतला. प्रगतीनगरला दत्तात्रय भोसले यांच्या मनगटाला चावले आहे. यामध्ये अनेक भागातील नागरिकांचा समावेश आहे.

Intro:Body:पिसाळलेल्या कुत्र्याचा एकोणीस जणांना चावा... 

बारामती –  मोकाट कुत्र्याने बारामती शहरातील प्रगतीनगर परिसरात एकोणीस जणांना चावा घेतला असल्याची घटना घडली आहे. चावा घेतलेल्या जखमींना उपचारासाठी नागरिकांनी तातडीने जिल्हा उपरुग्णालयात दाखल केले आहे.
      
बारामतीत काही दिवसांपासून मोकाट कुत्र्यांचा उपद्रव वाढू लागला आहे. मएसो शाळेच्या आवारात प्रवेश करून पिसाळलेल्या मोकाट कुत्र्याने एका विद्यार्थिनीच्या दंडाला चावा घेतला. तर दोन दिवसात तब्बल १९ जणांना चावा घेतल्याची माहिती उपजिल्हा रुग्णालय प्रशासनाने दिली आहे. यामध्ये १४ नागरिकांवर उपचार सुरू आहेत. तर पाच रुग्णांनी खाजगी रुग्णालयात उपचार घेतले आहे. प्रगतीनगर परिसरात पिसाळलेल्या कुत्र्याने फिरायला निघालेल्या अनेक नागरिकांना चावा घेतला आहे. माळावरच्या देवीच्या मंदिराजवळ स्वतच्या घराजवळ अनंत पाटील यांना पायाला व हाताला चावा घेतला आहे. मएसो शाळेचे सुरक्षा रक्षक दत्तात्रय शिंदे यांना हाताला मोठा चावा घेतला. शहरातील प्रगतीनगरला दत्तात्रय भोसले यांच्या मनगटाला चावले आहे. यामध्ये अनेक भागातील नागरिकांनाचा समावेश आहे.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.