पुणे : तीर्थक्षेत्र आळंदी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा संजीवन समाधी सोहळा ( Dnyaneshwar Maharaj Sanjeevan Samadhi sohala ) , कार्तिकी यात्रेला गुरुवारी सकाळी 7 महाद्वारातील गुरु हैबत बाबाच्या पायरी पूजनाने प्रारंभ होणार आहे. एकादशीची मुख्य पुजा रविवारी तर माऊलीचा संजीवन सोहळा कार्तिक वैद्य त्रयोदशीला पार पडणार आहे.
सात लाख भाविक दाखल होण्याची शक्यता : देवस्थानच्यावतीने प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने संपूर्ण तयारी करण्यात आल्याची माहिती संस्थांचे अध्यक्ष ॲड विकास ढगे यांनी दिली आहे. आळंदीमध्ये दोन वर्षाच्या निर्बंधानंतर हा सोहळा होणार आहे. त्यामुळे सात लाख भाविक आळंदीत दाखल होण्याची शक्यता आहे. आजपासूनच भाविक आळंदीत सहभागी होत आहेत. असेही अध्यक्ष यांनी सांगितलेला आहे. संस्थांच्या वतीने, आरोग्याच्या दृष्टीने, त्यांच्या पिण्याच्या पाण्याच्या दृष्टीने, राहण्याच्या दृष्टीने,संपूर्ण व्यवस्था करण्यात आली असून. या कार्यक्रमाला निमंत्रित म्हणून पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील आणि स्थानिक लोकप्रतिनिधी यांना आमंत्रित करण्यात आल्याचं संस्थांचे अध्यक्ष विकास ढगे यांनी सांगितलेला आहे.
नमामि इंद्रायणी प्रोजेक्ट राबवण्याची मागणी : संस्थेच्या वतीने राज्य शासनाकडे नमामिगंगेच्या धर्तीवर नमामि इंद्रायणी हा प्रोजेक्ट राबववा अशी मागणी करण्यात आलेली ( Namami Indrayani project Demand ) आहे. त्यातून आरोग्याचा जो प्रश्न आहे वारकऱ्यांचा तो सुटेल. वारकरी पवित्र स्नान म्हणून इंद्रायणी नदीत स्नान करतात. त्या ठिकाणी काही कारखाने, काही लोक घाण पाणी सोडून नदी अस्वच्छ झाली आहे. ती स्वच्छ व्हावी ,पाणी सोडतात त्यांच्यावर कारवाई देखील करावी. अशी मागणी सुद्धा संस्थांनी प्रशासनाकडे राज्य शासनाकडे केलेली आहे.
पोलीस प्रशासनाची जय्यत तयारी : नगरपालिका देवस्थान पोलीस प्रशासनाने जय्यत तयारी केली ( Police Administration Deployed At Alandi ) आहे. आळंदी कार्तिकी यात्रेच्यानिमित्त वारकरी मंदिरालगत दोन मजली दर्शन बारी असून त्या ठिकाणीही भाविकांची दर्शनाला जाण्याची सोय आहे. यात्रा काळात घातपाताची शक्यता आणि चेंगडाचेंगरी सारखी घटना होऊ नये यासाठी देऊळवाडा दर्शनासाठी आलेल्या वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी 114 सीसीटीव्ही कॅमेरे धातूशोधक यंत्रणा तपासणारी यंत्रणा बसवली आहे.
लाकडी दर्शन बारी : संत ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधी सोहळा आणि कार्तिकी यात्रेनिमित्त दर्शनासाठी नदीपलीकडील आरक्षित जागेत तात्पुरती लाकडी दर्शन बारी उभारण्याचे काम सुरू झाल आहे. दरवर्षी आषाढी व कार्तिकी वारीच्या वेळेस संबंधित जागेसाठी प्रशासनाकडे पत्रव्यवहार करून भाविकांसाठी दर्शनबारी उभारण्याकरिता प्रशासनाच्या लेखी आदेशाची गरज पडत आहे त्यामुळे त्या जागेचा कायमस्वरूपी प्रश्न सोडवावा अशी मागणी आळंदी संस्थांनी प्रशासनाकडे केलेली आहे.