पुणे - देवघरापासून ते स्वयंपाकघरातील भांडी व फ्रिजपर्यंत मोठ्या हौसेने मामा लोकांनी सजविलेले रुखवत. सनई-चौघडे आणि बँडच्या तालावर नाचणारी वऱ्हाडी मंडळी, अक्षतांच्या माध्यमातून शुभाशिर्वाद देण्यासाठी जमलेले वधू-वरांचे दृष्टीहिन व दिव्यांग बांधव अशा ह्रद्य वातावरणात दृष्टीहिन व दिव्यांग वधू-वरांचे रेशीमबंध जुळले. डोळ्याने दिसत नसले आणि आधाराशिवाय जरी चालता येत नसले, तरी आपले नातवाईक किंवा आपेष्ट नसूनही विवाह सोहळ्याकरता आलेल्या मान्यवरांचे भरभरुन प्रेम पाहून आणि आपुलकीने दिलेल्या शुभेच्छांनी वधू-वरांच्या डोळ्याच्या कडा आनंदाश्रूंनी पाणावल्या.
विविहासाठी करण्यात आले विशेष प्रयत्न - खेड येथे राहणारी प्रिती गाडे आणि अहमदनगरचा दत्तात्रय जाधव या दृष्टीहिन जोडप्याचा विवाह संपन्न झाला. प्रिती गाडे हिला वडिल नसून घरी आई आहे. तिचे पदवीपर्यंतचे शिक्षण वाडिया महाविद्यालयात झाले. आता ती बँक आॅफ इंडियामध्ये लेखनिक पदावर नोकरी करीत आहे. वयवर्षे ८ पासून ती लुई ब्रेल अंध अपंग कल्याण संस्थेमध्ये आहे. तर, दत्तात्रय जाधव याचे एम.ए. शिक्षण झाले असून स्पर्धा परीक्षेचा अभ्यास तो करत आहे. घरी आई, वडिल, भाऊ, बहिण असून वडिल शेती करतात. घरच्यांनी त्याला कष्टातून उभे केले आहे. हा देखील लुई ब्रेल अंध अपंग संस्थेतील विद्यार्थी आहे. संस्थेचे अरुण केंद्रे यांनी त्यांच्या विवाहासाठी विशेष प्रयत्न केले.
यंदा उपक्रमाचे ८ वे वर्ष होते - शुक्रवार पेठेतील सेवा मित्र मंडळ ट्रस्ट व लुई ब्रेल अंध अपंग कल्याण संस्थेतर्फे आर्थिकदृष्टया दुर्बळ असलेल्या दृष्टीहिन व दिव्यांग मुला - मुलींच्या अनोख्या विवाहसोहळयाचे. यावेळी वधू-वरांना शुभाशिर्वाद देण्यासाठी आयएएस अधिकारी विशाल सोलंकी, माजी विशेष पोलीस महानिरीक्षक चंद्रशेखर दैठणकर, विद्याधर अनास्कर, एअरमार्शल (निवृत्त) भूषण गोखले, आमदार माधुरी मिसाळ, हेमंत रासने, महेश सूर्यवंशी, अॅड.भगवान साळुंके, सुनिल रुकारी, सीए जनार्दन रणदिवे, रोहिणी चेन्नुर, सुनेत्रा रार्चला यांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी हजेरी लावली. शुभांगी व चारुदत्त आफळे, दीपा व सचिन ससाणे यांनी कन्यादान केले. यंदा उपक्रमाचे ८ वे वर्ष होते.
या दोघांचा विवाह सोहळा देखील यावेळी थाटात पार पडला - दुसरे दाम्पत्य कर्नाटकातील राधा बडीगेर आणि रामलिंग चलवदी या दिव्यांग जोडप्याचा विवाह सोहळा पार पडला. राधा ही कर्नाटकमधील असून सध्या डहाणूकर कॉलनी येथे राहते. तिचे आई-वडिल दोघेही बिगारी काम करतात. रामलिंग हा देखील मूळचा कर्नाटकमधील असून दत्तवाडी येथे राहतो. एका अपघातात त्याला अपंगत्व आले आहे. आता तो रिक्षा चालविण्याचा व्यवसाय करतो. या दोघांचा विवाह सोहळा देखील यावेळी थाटात पार पडला.
आजूबाजूच्या परिसरातील महिलांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला - सेवा मित्र मंडळ, इतर गणेशोत्सव मंडळांनी व पुणेकरांनी पुढाकार घेऊन लुई ब्रेल संस्थेसोबत या विवाहसोहळ्याची तयारी सुरु केली. गणेशोत्सव मंडळातील पदाधिका-यांनी आणि कार्यकर्त्यांनी या मुलींचे मामा म्हणून कन्यादान केले. मेहेंदी, साखरपुडा, हळदी समारंभ अशा सगळ्या कार्यक्रमात आजूबाजूच्या परिसरातील महिलांनी मोठया उत्साहाने सहभाग घेतला. गणेशोत्सव मंडळे, विविध संस्था आणि सामान्य नागरिकांनी दिलेल्या मदतीतून हा विवाहसोहळा मोठया उत्साहात पार पडला.अस यावेळी मंडळाचे अध्यक्ष शिरीष मोहोते म्हणाले.
विवाहसोहळ्यातून जुळले दिव्यांग आणि दृष्टीहिन मुला-मुलींचे रेशीमबंध - पुणे लुई ब्रेल अंध अपंग कल्याण संस्था
शुक्रवार पेठेतील सेवा मित्र मंडळ ट्रस्ट व लुई ब्रेल अंध अपंग कल्याण संस्थेतर्फे आर्थिकदृष्टया दुर्बळ असलेल्या दृष्टीहिन व दिव्यांग मुला - मुलींच्या अनोख्या विवाहसोहळयाचे. यावेळी वधू-वरांना शुभाशिर्वाद देण्यासाठी आयएएस अधिकारी विशाल सोलंकी, माजी विशेष पोलीस महानिरीक्षक चंद्रशेखर दैठणकर, विद्याधर अनास्कर, एअरमार्शल (निवृत्त) भूषण गोखले, आमदार माधुरी मिसाळ, हेमंत रासने, महेश सूर्यवंशी, अॅड.भगवान साळुंके, सुनिल रुकारी, सीए जनार्दन रणदिवे, रोहिणी चेन्नुर, सुनेत्रा रार्चला यांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी हजेरी लावली. शुभांगी व चारुदत्त आफळे, दीपा व सचिन ससाणे यांनी कन्यादान केले. यंदा उपक्रमाचे ८ वे वर्ष होते.