पुणे: देशामध्ये 1975 ते 1977 या कालावधीत घोषित आणीबाणी कालावधीत बंदिवास सोसावा लागलेल्या व्यक्तींना, मानधन देण्याबाबतची योजना पुन्हा सुरू करण्याचा निर्णय राज्य शासनाने State Govt घेतला आहे. आणीबाणी कालावधीत 1 महिन्यापेक्षा जास्त कारावास भोगलेल्या व्यक्तींना दरमहा 10 हजार रुपये व त्यांच्या पश्चात त्यांच्या पत्नीस, पतीस 5 हजार रुपये तर एक महिन्यापेक्षा कमी कारावास भोगलेल्या व्यक्तींना 5 हजार रुपये तर त्यांच्या पश्चात त्यांच्या पत्नीस, पतीस दरमहा 2 हजार 500 रुपये मानधन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
515 लाभार्थी 1975 ते 77 दरम्यान आणीबाणीच्या काळात ज्या लोकांनी तुरुंगवास भोगला त्या लोकांना पेन्शन योजना सुरू करण्यात आली. परंतु महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर ही योजना बंद करण्यात आली होती. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर शिंदे फडणवीस सरकारने Shinde Fadnavis Govt ही योजना पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला. आणि त्यानुसार लाभार्थ्यांची निवड करण्याचे आणि निधी वितरण करण्याचे आदेश दिले. त्यानुसार पुणे जिल्ह्यामध्ये आणीबाणीमध्ये तुरुंगवास उपभोगलेले 515 लाभार्थी आहेत. त्यांना या नवीन योजनाचा फायदा होणार आहे. त्यासाठीचा निधी पुणे जिल्ह्यामध्ये जमा झालेला असून तालुकानिहाय त्याचे वितरण लवकरच करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्याने सांगितले आहे.
मानधन वितरित करण्याचा निर्णय ही योजना 31 जुलै 2020 च्या शासन निर्णयानुसार बंद करण्यात आली होती. राज्य शासनाने 28 जुलै 2022 रोजी शासन निर्णय जारी करून पुन्हा ही योजना सुरू केली असून, ऑगस्ट 2020 पासूनचे सर्व महिन्यांचे मानधन वितरित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार या लाभार्थ्यांचे मानधन फरकासह जिल्हाधिकारी कार्यालयास प्राप्त झालेले आहे.
27 महिन्यांचे मानधन ऑगस्ट 2020 ते ऑक्टोबर 2022 असे 27 महिन्यांच्या मानधनाची एकूण 12 कोटी 17 लाख 2 हजार 500 रुपये रक्कम पात्र 515 लाभार्थ्यांना वितरित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिली.
तालुकानिहाय लाभर्थी संख्या पुणे शहर 247, हवेली 169, अप्पर तहसील पिंपरी चिंचवड, 65, खेड 5, मुळशी 9, भोर13, मावळ19, दौंड 3, बारामती3, इंदापूर1, पुरंदर 2, जुन्नर 3, शिरूर 12, अशी आहे.