ETV Bharat / state

'कामगार व उत्पादनशुल्क मंत्री पदाची जबाबदारी सक्षमपणे पार पाडेन' - कामगार व उत्पादनशुल्क मंत्री दिलीप वळसे-पाटील

उत्पादन शुल्क विभाग हा राज्याला मोठ्या प्रमाणात उत्पन्न देणारा विभाग आहे. येणाऱ्या काळात या विभागामध्ये चांगल्या पद्धतीने काम करून सरकारचे उत्पन्न वाढवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे वळसे-पाटील यावेळी म्हणाले. कामगार आणि उद्योग मालकांचा एकमेकांमध्ये समन्वय साधून उद्योगांना चालना देण्याचा आणि स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

patil
दिलीप वळसे-पाटील, कॅबिनेट मंत्री
author img

By

Published : Jan 5, 2020, 8:08 PM IST

पुणे - शरद पवार यांचे स्वीय सहाय्यक ते सातव्यांदा आंबेगाव विधानसभा मतदारसंघातून आमदार, असा राजकीय प्रवास करणाऱ्या दिलीप वळसे-पाटील यांना महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये कामगार आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाची जबाबदारी देण्यात आली आहे. खाते वाटपानंतर दिलेली जबाबदारी सक्षमपणे पार पाडणार असल्याची प्रतिक्रिया वळसे-पाटील यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली आहे.

दिलीप वळसे-पाटील, कॅबिनेट मंत्री

उत्पादन शुल्क विभाग हा राज्याला मोठ्या प्रमाणात उत्पन्न देणारा विभाग आहे. येणाऱ्या काळात या विभागामध्ये चांगल्या पद्धतीने काम करून सरकारचे उत्पन्न वाढवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे वळसे-पाटील यावेळी म्हणाले. कामगार आणि उद्योग मालकांचा एकमेकांमध्ये समन्वय साधून उद्योगांना चालना देण्याचा आणि स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा - 'सामान्य माणसाच्या समस्या सोडवण्यासाठी गरज पडल्यास मंत्रालयाबाहेर खुर्ची टाकून बसेन'

कामगार आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाची जबाबदारी मिळाल्यानंतर मंचर येथे मतदारसंघातील कार्यकर्ते व महाविकास आघाडीच्या वतीने दिलीप वळसे-पाटील यांचा सत्कार समारंभ पार पडला. यावेळी शिवसेना नेते मात्र गैरहजर असल्याचे पाहायला मिळाले.

आढळराव पाटील आणि वळसे-पाटील यांची जोडी एकत्र दिसणार?

राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तीन पक्षांनी एकत्र येत सत्ता स्थापन केल्यानंतर महाविकास आघाडीतील मंत्र्यांना अखेर जबाबदाऱ्या देण्यात आल्या. दिलीप वळसे-पाटलांच्या सत्कार समारंभाला शिवसेनेचे माजी खासदार आणि दिलीप वळसे पाटील यांचे जुने मित्र शिवाजी आढळराव-पाटील हे मात्र दिसले नाहीत. त्यामुळे येणाऱ्या काळात आढळराव पाटील आणि वळसे-पाटील हे दोघे एकत्र दिसणार का, हा प्रश्न मतदार संघातील नागरिकांना पडला आहे.

Intro:Anc_ शरद पवार यांचे स्वीय सहाय्यक त्यानंतर आंबेगाव विधानसभा मतदारसंघातून आमदार आणि वैद्यकिय शिक्षण,उच्च तंत्रशिक्षण, ऊर्जामंत्री,अर्थमंत्री आणि विधानसभा अध्यक्ष असा राजकीय प्रवास करून दिलीप वळसे-पाटील सातव्यांदा आंबेगाव विधानसभा मतदारसंघातून निवडून गेल्यानंतर आता महाविकासआघाडीच्या सरकारमध्ये कामगार आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाची जबाबदारी दिल्यानंतर ही जबाबदारी सक्षमपणे पार पाडणार असल्याचे दिलीप वळसेपाटील यांनी सांगितले

उत्पादन शुल्क विभाग हा राज्याला मोठ्या प्रमाणात उत्पन्न देणारा विभाग असून पुढील काळात या विभागांमध्ये चांगल्या पद्धतीने काम करून सरकारचे उत्पन्न वाढविण्यासाठी प्रयत्न करणार आहे तर राज्यातील आर्थिक मंदी आणि कामगारांचे प्रश्न असे गंभीर प्रश्न समोर असताना कामगार आणि उद्योग मालकांचा एकमेकांमध्ये समन्वय करुन उद्योगांना चालना देऊन स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी काम करणार असल्याचे दिलीप वळसे-पाटील यांनी सांगितले

कामगार व राज्य उत्पादन शुल्क विभागाची जबाबदारी मिळाल्यानंतर मंचर येथे मतदारसंघातील कार्यकर्ते व महाविकास आघाडीच्या वतीने दिलीप वळसे पाटील यांचा सत्कार समारंभ पार पडला मात्र यावेळी शिवसेना नेत्यांची गैरहजरी पहायला मिळाली

आढळरावपाटील व वळसेपाटील यांची जोडी एकत्र दिसणार का..?

राज्यामध्ये शिवसेना,राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे तीन पक्ष एकत्र येऊन महाविकासआघाडी तयार होऊन खाते वाटप होऊन आज महाविकास आघाडीतील मंत्र्यांना जबाबदाऱ्या देण्यात आल्या त्यामध्ये आंबेगाव विधानसभा मतदारसंघातून सातव्यांदा निवडून गेलेले दिलीप वळसे पाटील यांना कामगार व राज्य उत्पादन शुल्क जबाबदारी मिळाली यावेळी आंबेगाव विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांनी दिलीप वळसे पाटील यांचा सत्कार समारंभ कार्यक्रम आयोजित केला होता यावेळी शिवसेनेचे माजी खासदार व दिलीप वळसे पाटील यांचे जुने मित्र शिवाजी आढळराव पाटील हे सन्मान सोहळ्यात दिसले नाही त्यामुळे पुढील काळात आढळरावपाटील व वळसेपाटील हे दोघे एकत्र येऊन जनतेसमोर केव्हा जाणार आहे यावर मतदारसंघात चर्चा सुरु आहे.Body:...Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.