पिंपरी-चिंचवड (पुणे) - भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि कॅप्टन कुल महेंद्रसिंग धोनीने पुण्यातील गहुंजे क्रिकेट स्टेडियम जवळ फ्लॅट घेतल्याची माहिती समोर आली आहे. स्टेडियम जवळच असणाऱ्या किवळे परिसरातील इस्टाडो प्रेसिडेंशियल (ESTADO PRESIDENTIAL) या इमारतीत त्याने फ्लॅट घेतला आहे.
हेही वाचा - गुन्हे शाखेच्या पोलिसाकडून डॉक्टरला मारहाण; पुण्याच्या कोविड सेंटरमधील धक्कादायक प्रकार
धोनीने यष्टिरक्षक म्हणून भारतीय संघात स्थान मिळवले. अल्पावधीतच त्याने चाहत्यांचे मने जिंकली. यष्टिरक्षण करत असताना त्याने स्फोटक फलंदाजी करत अनेक सामने जिंकून दिले, तर 2011 ला झालेला विश्वचषक जिंकून भारतीय संघाचे स्वप्न पूर्ण केले. याच दरम्यान, पुण्यात आयपीएल सामने खेळणाऱ्या महेंद्रसिंग धोनीने इस्टाडो प्रेसिडेंशियल या इमारतीत फ्लॅट घेतला, अशी माहिती स्थानिक नागरिकांनी दिली आहे.
धोनी अनेकदा या ठिकाणी राहण्यास आला असून गेल्या काही दिवसांपासून तो आला नसल्याचे तेथील रहिवाशांकडून सांगण्यात आले. क्रिकेट स्टेडियम परिसरातील नयनरम्य निसर्ग पाहूनच हा फ्लॅट त्याने घेतला असावा अशी चर्चा आहे.
हेही वाचा - जि. प .सदस्याच्या पती रविराज तावरे यांच्यावर अज्ञातांचा गोळीबार