पुणे - राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि परळीचे नवनियुक्त आमदार धनंजय मुंडेंनी एक फेसबुक पोस्ट शेअर केली आहे. पोस्टबरोबर त्यांनी खासदार सुप्रिया सुळेंचा फोटो शेअर केला आहे. त्या पोस्टमध्ये त्यांनी
'मानलेलं जरी असलं
तरी रक्ताच्या नात्याहून कमी नसतं,
बहिण भावाचे नातं असंच अनमोल असतं'!
असे म्हणत धनंजय मुंडेंनी खासदार सुप्रिया सुळेंबरोबरचा फोटो शेअर केला आहे.
उद्या भाऊबीज व आजच गोविंदबागेत सुप्रियाताई सुळे यांनी शुभेच्छा देऊन आशीर्वाद दिला. भाऊबीजेच्या आधीच मला आशीर्वादरुपी भाऊबीज मिळाली. त्याचा आनंद शब्दात व्यक्त करणंसुद्धा कठीण असल्याचे म्हटले आहे. धनंजय मुंडेंनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची आज बारामतीत जाऊन सदिच्छा भेट घेतली. तसेच त्यांच्याबरोबर सुप्रिया सुळे, अजित पवार यांची भेट घेऊन दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. शरद पवार यांनी आपल्या झुंजार वृत्तीने जीवनातील प्रत्येक लढाई जिंकलेले शरद पवार हे ८० वर्षांचे तरुण सर्व तरुणांच्या गळ्यातील ताईत बनले आहेत. साहेब तुम्ही आमची प्रेरणा आहात. सदैव आशीर्वाद असुद्या, असेही धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.