पुणे : गेल्या काही दिवसांपासून विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर ( BJP Protest Against Ajit Pawars Statement ) केलेल्या विधानाने त्यांच्या विरोधात भारतीय जनता पक्ष ( Chhatrapati Sambhaji Maharaj is a Dharmavir ) तसेच हिंदुत्ववादी संघटनांकडून ( BJP Protest Against Ajit Pawars Statement ) आंदोलने केली जात आहेत. तर काल राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीदेखील याविषयी आपले मत व्यक्त करीत प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य असून, ज्याला धर्मवीर म्हणायचे आहे त्यांनी धर्मवीर म्हणावे, ज्याला स्वराज्यरक्षक म्हणायचे आहे, त्याने स्वराज्यरक्षक म्हणावे, असे म्हटले. आता यावर देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली प्रतिक्रिया यावर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की, छत्रपती संभाजी महाराज यांना स्वराज्यरक्षक म्हणायला कोणाचीही ना नाही, ते स्वराज्यरक्षकच आहेत. पण, ते धर्मवीर नाही असे म्हणणे हा एक प्रकारे संभाजी महाराज यांच्या विचारांचा द्रोह आहे. संभाजी महाराज यांच्यावरचा हा अन्याय आहे.
देव, देश आणि धर्मासाठी छत्रपती संभाजी महाराज लढले खऱ्या अर्थाने देव, देश आणि धर्मासाठी छत्रपती संभाजी महाराज लढले आणि छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज नसते, तर या राज्यात हिंदूच उरले नसते. त्यामुळे ते धर्मवीरच आहेत. त्यांना धर्मवीर नाही म्हणणे हा द्रोह आहे, असे यावेळी फडणवीस म्हणाले. पुण्यातील न्यू इंग्लिश स्कूल टिळक रोड येथील डेक्कन एज्युकेशन सोसायटी, पुणेच्या नूतन वास्तूचे उद्घाटन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी ते बोलत होते.
देवेन भारती यांच्या निवडीवर फडणवीसांची प्रतिक्रिया मुंबईत देवेन भारती यांची जी निवड करण्यात आली आहे. त्याबाबत फडणवीस यांना विचारले असता ते म्हणाले की, पूर्वी मुंबईमध्ये सिपींचे पद हे एडीजी पद होते. ज्यावेळेस मी मुख्यमंत्री झालो तेव्हा ते पद मी डीजीचे केले. त्यामुळे आपल्याकडे जॉईन सीपी हे जे असतात ते आयजी लेवलचे असतात. आयजी लेवलच्या ऑफिसरने एडीजी लेवलच्या अधिकाऱ्याला रिपोर्टींग केले पाहिजे.