ETV Bharat / state

'सावरकरांपेक्षा विकासाचा मुद्दा अधिक महत्वाचा'

सध्या सावरकरांच्या मुद्यापेक्षा देशातील बंद पडलेल्या कंपन्या सुरू कशा होतील आणि तरुणांना रोजगार कसा मिळेल, याचा विचार करणे गरजेचे आहे, असे काँग्रेस नेते हुसेन दलवाई यांनी म्हटले आहे.

dalwai
काँग्रेस नेते हुसेन दलवाई
author img

By

Published : Dec 15, 2019, 11:36 PM IST

पुणे - 'सध्या देशात सुरू असलेला सावरकर हा महत्त्वाचा मुद्दा नाही त्यापेक्षा विकासाचा मुद्दा अधिक महत्वाचा आहे', असे मत काँग्रेस नेते हुसेन दलवाई यांनी व्यक्त केले आहे. पुण्यात एका कार्यक्रमासाठी आले असताना त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

काँग्रेस नेते हुसेन दलवाई

हुसेन दलवाई म्हणाले, "देशातील बंद पडलेल्या कंपन्या सुरू कशा होतील आणि तरुणांना रोजगार कसा मिळेल, याचा विचार करणे गरजेचे आहे. समाजातील सर्व घटकांना एकत्रीत आणून त्यांचा सर्वांगीण विकास कसा होईल, याचे स्वप्न लोकांना दाखवणे आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणे अधिक महत्त्वाचे आहे"

हेही वाचा - 'भाजपला सावरकरांचा पुळका म्हणजे ढोंग'

सरकार पाच वर्षे निर्धोकपणे चालेल

सरकार पडावे म्हणून कोणी पाण्यात देव बुडवून बसले असतील तर त्यांची निराशा होईल. हे सरकार पाच वर्षे निर्धोकपणे चालेल. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यात कितीही मतभेद असले तरी ते एकमेकांशी जुळवून घेतील. काँग्रेस आणि शिवसेनेची विचारधारा वेगवेगळी असल्याने मतभेद हे होणारच. मात्र, भाजप आणि शिवसेनेइतके आमचे संबध टोकाचे नाहीत, असे दलवाई यांनी म्हटले आहे.

Intro:सावरकरांपेक्षा विकासाचा मुद्दा अधिक महत्वाचा - हुसेन दलवाई

सध्या देशात सुरू असलेला सावरकर हा काही महत्त्वाचा मुद्दा नाही त्यापेक्षा विकासाचा मुद्दा अधिक महत्वाचा असल्याचे काँग्रेस नेते हुसेन दलवाई यांनी सांगितले. पुण्यात एका कार्यक्रमासाठी आले असताना त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

Body:हुसेन दलवाई म्हणाले, देशातील अनेक कंपन्या बंद पडल्या आहेत. अनेक तरुणांचे रोजगार बुडाले आहेत. या कंपन्या सुरू कशा होतील आणि तरुणांना रोजगार कसा मिळेल याचा विचार करणे अधिक गरजेचे आहे. समाजातील सर्व घटकांना एकत्रित आणून त्यांचा सर्वांगीण विकास कसा होईल हे स्वप्न दाखवणे आणि ते स्वप्न पूर्ण करून घेणे हे अधिक महत्त्वाचे आहे.

Conclusion:सरकार पाच वर्षे निर्धोकपणे चालेल

सरकार पडावे म्हणून कोणी पाण्यात देव बुडून बसले असतील तर त्यांची निराशा होईल. पण हे सरकार पाच वर्षे निर्धोकपणे चालेल. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यात कितीही मतभेद असले तरी ते एकमेकांशी जुळवून घेतील. भाजप आणि शिवसेनेइतके आमचे संबध टोकाचे नाहीत.
काँग्रेस आणि शिवसेनेची विचारधारा वेगवेगळी असल्याने मतभेद हे होणारच. आमच्या सरकारचे नावच महाराष्ट्र विकास आघाडी आहे. आणि महाराष्ट्राच्या विकासासाठीच आमचे सरकार झाले आहे
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.