ETV Bharat / state

MSRTC Workers Strike : एसटी कर्मचाऱ्यांना भडकवण्याचा प्रयत्न.. यापुढे सीएनजी किंवा इलेक्ट्रिक बसेस धावणार - अजित पवार

राज्य सरकारने पगारवाढीची घोषणा करूनही एसटी कामगारांचा संप (MSRTC Workers Strike) सुरूच आहे. विलिनीकरणाच्या मागणीवर कर्चमचारी अडून बसले आहेत. या कर्मचाऱ्यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुन्हा एकदा कामावर येण्याचं आवाहन केलं. 'असा हट्टीपणा कधीच चालत नाही,' असं परखड मतही अजित पवार (Ajit Pawar) यांनी मांडले.

deputy cm ajit pawar
deputy cm ajit pawar
author img

By

Published : Dec 6, 2021, 5:30 PM IST

Updated : Dec 6, 2021, 6:23 PM IST

बारामती - एसटीच्या संदर्भात मार्ग काढण्याचा प्रयत्न केला आहे. (MSRTC Workers Strike) कर्मचाऱ्यांची पगारवाढ करण्यात आली आहे. शाळा सुरू झाल्यामुळे मुलांना बस आवश्यक आहे. गोरगरिबांना प्रवासासाठी एसटी लागते. काही राज्यांचा आढावा घेऊन पगारवाढ करण्यात आली आहे. एसटी कामगारांना भडकवण्याचा प्रयत्न केला जातोय, असा हट्टीपणा कधीच चालत नाही. असं सरकार चालू शकत नाही, असं केलं तरच आम्ही काम करू असं म्हणायला लागले तर ती संस्था कशी चालेल? आमची बळजबरी नाही विनंती आहे की, आम्ही काही पाऊल मागे सरकू त्यांनीही काही पाऊल पाठीमागे सरकलं पाहिजे. तेव्हाच मार्ग निघेल. (Deputy cm Ajit Pawar on MSRTC Workers Strike) आज ही विनंती करतो. इथून पुढे बस घ्यायची तर सीएनजी किंवा इलेक्ट्रीक बसेस घ्यायच्या. (Ajit Pawar on CNG or Electric buses) यामुळे प्रदूषण होत नाही. यातून सर्वांना फायदा होणार आहे. असे मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले. बारामती तालुक्यातील माळेगाव येथे आयोजित एका कार्यक्रमात पवार बोलत होते.

राज्य सरकारने पगारवाढीची घोषणा करूनही एसटी कामगारांचा संप (MSRTC Workers Strike) सुरूच आहे. विलिनीकरणाच्या मागणीवर कर्चमचारी अडून बसले आहेत. या कर्मचाऱ्यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुन्हा एकदा कामावर येण्याचं आवाहन केलं.

कार्यक्रमात बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार
सरकारला जास्त लुटू नका -
संत तुकाराम महाराज पालखी महामार्ग रुंदीकरण कामाची पहाणी करताना, एका शेतकऱ्याने संपादीत जमिनीवर नव्याने आंब्याची झाडे लावल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निदर्शनास आले. यावेळी बोलताना पवार म्हणाले, ज्या रस्त्याचे रुंदीकरण होणार आहे, तेवढ्याच जागेत त्या पट्ट्याने आंब्याची झाडे लावली आहेत. ज्या ठिकाणी त्याची हद्द सुरू होते तिथे एक आंब्याच झाड लावले नाही. सरकारला एवढं लुटू नका! सरकार तुमचंच आहे. हे बरोबर नाही हा जनतेचा पैसा आहे, असेही पवार म्हणाले.
दोन्ही लस घेण्याचे आवाहन -
ओमायक्रॉनने शिरकाव केला आहे. याचा संसर्ग पसरत आहे. यात कोणी अद्याप दगावलेले नाही. मात्र, काही फुटांवर बसलेल्या व्यक्तींला याची बाधा होऊ शकते. त्यामुळे सर्वांनी मास्कचा वापर करावा, शिवाय लसीकरणाचे दोन्ही डोस घेतलेले असावेत, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नागरिकांना आवाहन केले आहे.

Last Updated : Dec 6, 2021, 6:23 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.