ETV Bharat / state

कसा का होईना पण मी चारवेळा उपमुख्यमंत्री - अजित पवार

आम्ही अनेक वर्ष मुख्यमंत्री पदावर असलेल्यांबरोबर काम केलेले कार्यकर्ते आहोत. पवार साहेब ही चार वेळा मुख्यमंत्री झाले म्हणून मीही कसे का होईना चार वेळा उपमुख्यमंत्री झालो. मात्र, आम्ही कोणाला त्रास न देता लोकशाही मार्गाने कारभार केला. गेल्या पाच वर्षातील साखर कारखान्याच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या उमेदवारांना भाजप विचाराच्या लोकांनी त्रास देण्याचे काम केल्याचे पवार म्हणाले.

pune
कसा का होईना पण मी चारवेळा उपमुख्यमंत्री झालो - अजित पवार
author img

By

Published : Jan 18, 2020, 9:06 PM IST

पुणे - पवार साहेब चार वेळा मुख्यमंत्री झाले म्हणून मीही कसे का होईना, पण चार वेळा उपमुख्यमंत्री झाल्याचे विधान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. बारामतीच्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीनिमित्त आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात पवार बोलत होते.

कसा का होईला पण मी चारवेळा उपमुख्यमंत्री झालो - अजित पवार

हेही वाचा - आमीर खानची बारामतीत मुक्काम करण्याची इच्छा

यावेळी झालेल्या कार्यकर्ता मेळव्यात बोलताना पवार म्हणाले, की आम्ही अनेक वर्ष मुख्यमंत्री पदावर असलेल्यांबरोबर काम केलेले कार्यकर्ते आहोत. पवार साहेब ही चार वेळा मुख्यमंत्री झाले म्हणून मीही कसे का होईना चार वेळा उपमुख्यमंत्री झालो. मात्र, आम्ही कोणाला त्रास न देता लोकशाही मार्गाने कारभार केला. गेल्या पाच वर्षातील साखर कारखान्याच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या उमेदवारांना भाजप विचाराच्या लोकांनी त्रास देण्याचे काम केल्याचे पवार म्हणाले.

हेही वाचा - मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या हस्ते बारामती कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन

पुढे बोलताना पवार म्हणाले, की आपल्या पाठिंब्याच्या जोरावर माझ्यासारखा कार्यकर्ता अनेकदा बारामतीतून विजयी झाला. यंदा आपण मला प्रचंड मताधिक्याने निवडून दिल्यामुळे माझी जबाबदारी वाढली आहे. त्यातच उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यापासूनच रात्रंदिवस कामाला सुरुवात केली असल्याचेही ते म्हणाले. महाविकास आघाडीचे सरकार आल्याने जनतेच्या अपेक्षा वाढल्या आहेत. आमच्या सरकारच्या कार्यकाळात अनेक महिलांना, तरुणांना रोजगार मिळेल, अशी आशा निर्माण झाली आहे. प्रत्येकाला आपण रोजगार कसा मिळेल यासाठी पुढील काळात प्रयत्न करणार असल्याचेही पवार म्हणाले. महाविकास आघाडीच्या सरकारने शेतकऱ्यांच्या कर्ज माफीचा निर्णय घेतला आहे. 2 लाखापर्यंतचा कर्जमाफीचा निर्णय झाला असून 2 लाखांहून अधिक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांच्या संदर्भातही निर्णय चालू आहे. तसेच नियमित कर्ज फेडण्याऱ्या शेतकऱ्यांचाही विचार चालू आहे. यासंबंधी माझ्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली असून माहिती गोळा करण्याचे काम चालू आहे. माहिती मिळताच बारामतीसाठी 120 कोटी रुपयांची कर्जमाफीची रक्कम मिळेल असेही यावेळी पवार म्हणाले.

जाणून बुजून सहकार खाते राष्ट्रवादीकडे घेतले...

1999 ते 2014 पर्यंत राष्ट्रवादीकडे सहकार खाते नव्हते. ग्रामीण भागाचा चेहरामोहरा बदलण्याची ताकद सहकार खात्यात आहे. यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील आणि शरद पवार यांनी सहकार क्षेत्रात केलेले काम पाहता सहकार खाते हे आपल्याकडेच असावे म्हणून हे खाते आपणाकडे घेतले असल्याचे त्यांनी सांगितले.

बाजार समितीला एक हजार मेट्रिक टनाचे गोडाऊन मंजूर.

आगामी काळात राज्यातील बाजार समित्यांनाही मदत करण्याचा प्रयत्न चालू असून बारामती बाजार समितीला 1 हजार मेट्रिक टनाचे गोडाऊन जळोची उपबाजार समितीला मंजूर झाले आहे. त्यासाठी 1 कोटी 4 लाखा पैकी 57 लाख अनुदान दिले आहे. तर स्वतःचा निधी 47 लाख आहे अशा प्रकारची कामे योजना मागील पाच वर्षाच्या काळात ज्या गतीने व्हायला पाहिजे होती ती झाली नाहीत, असे पवार यावेळी म्हणाले.

बारामतीकरांना पाईपलाईनद्वारे होणार गॅस पुरवठा..

आता बारामतीकरांना गॅसची टाकी मोटर सायकलवरून आणण्याची गरज राहणार नसून स्वयंपाकासाठी लागणारा गॅस पाईपलाईनद्वारे पुरवला जाणार असून त्या संबंधीच्या सर्व मंजुऱ्या मिळाल्या असल्याचे पवार यांनी सांगितले.

अजित पवार यांच्या भाषणातील ठळक मुद्दे...

  • बारामती शहरात पाईपलाईनद्वारे घराघरांत गॅस पुरवठा
  • शेतमालाला योग्य भाव आणि पाण्याचे नियोजन
  • शहरात दोन नव्या उद्यानांची उभारणी
  • बस स्थानक, रेल्वे स्टेशन अत्याधुनिक करणार
  • सुसज्ज पोलीस वसाहत उभारणार
  • शहरातील रेल्वे रूळ ओलांडण्यासाठी सबवे तयार करणार

Intro:Body:बारामती...

म्हणून मीही कसे का होईना चार वेळा उपमुख्यमंत्री झालो.. अजित पवार

अनेक वर्ष मुख्यमंत्री पदावर असलेल्या बरोबर आम्ही काम केलेले कार्यकर्ते आहोत. पवार साहेब ही चार वेळा मुख्यमंत्री झाले म्हणून मीही कसे का होईना चार वेळा उपमुख्यमंत्री झालो.. मात्र आम्ही कोणाला त्रास न देता लोकशाही मार्गाने कारभार हाकला. गत 5 वर्षातील साखर कारखान्याच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या उमेदवारांना  भाजप विचाराच्या  लोकांनी  त्रास देण्याचे काम केल्याचे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीी केले...

माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकी निमित्त आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात पवार बोलत होते.

शेतकऱ्यांचे राहणीमान बदलले पाहिजे शेतकऱ्यांना नवनवीन व्यवसायाची आवड निर्माण झाली पाहिजे आधुनिक पद्धतीने शेती कशी करावी याचे प्रात्यक्षिकासह कृषिक मधून माहिती दिली जात आहे आमच्यासारख्या व या क्षेत्रात तील तज्ञांकडून माहिती देण्यापेक्षा प्रात्यक्षिकातून खूप काही शिकता येते असे त्यांनी सांगितले.

पुढे बोलताना ते म्हणाले की आपल्या पाठिंब्याच्या जोरावर माझ्यासारखा कार्यकर्ता अनेकदा बारामतीतून विजय झाला यंदा आपण मला प्रचंड मताधिक्याने निवडून दिले त्यामुळे माजी आणखी जबाबदारी वाढली आणि उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्या पासूनच रात्रंदिवस कामाला सुरुवात केली असल्याचे ते म्हणाले.

 महा विकास आघाडीचे सरकार आल्याने अनेकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत अनेक महिला भगिनींना तरुणांना रोजगार मिळेल अशी आशा निर्माण झाली आहे अशा प्रत्येकाला आपण रोजगार कसा मिळेल यासाठी पुढील काळात प्रयत्न करणार असल्याचे पवार म्हणाले. महाविकास आघाडीच्या सरकारने शेतकऱ्यांच्या कर्ज माफीचा निर्णय घेतला आहे 2 लाखा पर्यंतचा कर्जमाफीचा निर्णय झाला असून दोन लाखाहून अधिक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांच्या संदर्भातही निर्णय चालू आहे तसेच नियमित कर्ज फेडण्यात शेतकऱ्यांचा ही  विचार चालू आहे यासंबंधी माझ्या अध्यक्षतेखाली एक समिती असून माहिती गोळा करण्याचे काम चालू आहे माहिती मिळताच बारामतीसाठी 120 कोटी रुपयांची कर्जमाफीची रक्कम मिळेल असेही या वेळी पवार म्हणाले.

जाणून बुजून सहकार खाते राष्ट्रवादीकडे घेतले...

1999 ते 2014 पर्यंत आपल्याकडे सहकार खाते नव्हते ग्रामीण भागाचा चेहरामोहरा बदलण्याचे क्षेत्र सहकार खात्यात आहे. यशवंतराव चव्हाण वसंतदादा पाटील आणि शरद पवार यांनी सहकार क्षेत्रात केलेले काम पाहता सहकार खाते हे आपल्याकडेच असावे म्हणून हे खाते आपणाकडे घेतले असल्याचे त्यांनी सांगितले.

बाजार समितीला एक हजार मेट्रिक टनाचे गोडाऊन मंजूर.

आगामी काळात राज्यातील बाजार समित्यांना ही मदत करण्याचा प्रयत्न चालू असून बारामती बाजार समितीला एक हजार मेट्रिक टनाचे गोडाऊन जळोची उपबाजार समिती ला मंजूर झाले आहे त्यासाठी एक कोटी चार लाखाचे पैकी अनुदान 57 लाख आहे तर स्वतःचा निधी 47 लाख आहे अशा प्रकारची कामे योजना मागील पाच वर्षाच्या काळात ज्या गतीने व्हायला पाहिजे होत्या त्या झाल्या नाहीत असे पवार यावेळी म्हणाले.

बारामतीकरांना पाईपलाईन द्वारे होणार गॅस पुरवठा..

आता बारामतीकरांना गॅस ची टाकी मोटरसायकलवरून आणण्याची गरज राहणार नसून स्वयंपाकासाठी लागणारा गॅस पाईपलाईन द्वारे पुरवला जाणार असून त्या संबंधीच्या सर्व मंजुऱ्या मिळाले असल्याचे पवार यांनी सांगितले.

अजित पवार यांच्या भाषणातील ठळक मुद्दे...

पाइपलाइनद्वारे घराघरांत गॅस पुरवठा, 

शेतमालाला योग्य भाव, पाणी नियोजन,

 शहरात २ नव्या उद्यानांची उभारणी यांसारख्या अनेक 

बस स्थानक रेल्वे स्टेशन अत्याधुनिक करणार

सुसज्ज पोलीस वसाहत उभारणार

शहरातील रेल्वे रूळ ओलांडण्यासाठी सबवे तयार करणारConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.