ETV Bharat / state

पुण्यात बंद घरात आढळले वृद्ध दाम्पत्याचे कुजलेल्या अवस्थेत मृतदेह, कारण अस्पष्ट - पुणे गुन्हेवार्ता बातमी

पुण्याच्या शिवाजीनगर गावठाण परिसरातील एका इमारतीतील फ्लॅटमध्ये शिंदे पती-पत्नी राहत होते. या दोघांचाही कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह त्यांच्या राहत्या घरात आढळून आला. ही घटना शनिवारी संध्याकाळी उघडकीस आली असून यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

पुण्यात बंद घरात आढळले वृद्ध दाम्पत्याचे मृतदेह

author img

By

Published : Jul 26, 2020, 4:04 PM IST

पुणे - पुण्यातील शिवाजीनगर परिसरातील एका बंद घरामध्ये वृद्ध दाम्पत्याचे मृतदेह कुजलेल्या स्थितीत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. ही घटना शनिवारी सायंकाळच्या सुमारास उघडकीस आली. काही दिवसापूर्वी या दाम्पत्याचा मृत्यू झाला असावा कारण हे दोन्ही मृतदेह अक्षरशः सडलेल्या अवस्थेत होते. संभाजी बापू शिंदे (75) आणि शोभा संभाजी शिंदे (70) असे मृत दाम्पत्याचे नाव आहे.

शिंदे पती-पत्नी दोघेही पुण्याच्या शिवाजीनगर गावठाण परिसरातील एका इमारतीतील फ्लॅटमध्ये राहत होते. त्यांना मूलबाळ नव्हते. दोघेच राहत असल्यामुळे त्यांचे नातेवाईक चौकशीसाठी वेळोवेळी येत असत. परंतु सध्या सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे अनेक दिवसांपासून कोणीही नातेवाईक त्यांच्याकडे येऊ शकले नव्हते. दरम्यान मागील अनेक दिवसांपासून या दाम्पत्याशी फोनवरून संपर्क होत नव्हता म्हणून मृत महिलेच्या बहिणीची मुलगी शनिवारी सायंकाळी त्यांच्या घरी आली. भराच वेळ दारवाजा वाजवूनही उघडला जात नसल्यामुळे त्यांनी शेजारील नागरिकांच्या मदतीने दरवाजा तोडून आत प्रवेश केला. यावेळी दोघांचेही कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आले.

दरम्यान शिवाजीनगर पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवले. त्यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे अद्याप कळू शकली नाही. अंदाजे पाच ते सहा दिवसांपूर्वी त्यांचा मृत्यू झाला असावा असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस अधिक तपास करत आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.