पुणे : पुण्यातील मनसेचे धडाकेबाज नेते म्हणून वसंत मोरे यांची ओळख आहे. परंतु, याच वसंत मोरे यांच्या मुलाच्या नावे बनावट व्हा सर्टिफिकेटवरून तीस लाख रुपये खंडणी मागणी केल्याचा प्रकार समोर आलेला आहे. पैसे नाही दिल्यास गोळ्या घालण्याची धमकीसुद्धा यात दिली आहे. या विरोधात आता भारती पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रमाणपत्र सोशल मीडियातून व्हायरल करण्याची धमकी : मनसेचे नेते वसंत मोरे यांचा चिरंजीव रुपेश यांच्या नावे बनावट विवाह नोंदणी प्रमाणपत्र तयार करण्यात आले आहे. खंडणी मागणाऱ्या व्यक्तीने हे विवाह प्रमाणपत्र वेगवेगळ्या सामाजिक माध्यमातून सोशल मीडियातून व्हायरल करण्याची धमकी दिलीये. तसेच, त्यानंतर खंडणी मागितली आहे. ती नाही दिली तर गोळ्या घालून जीवे मारण्याची धमकीसुद्धा देण्यात आली आहे.
व्हाट्सएपवर मेसेज करत धमकी : मनसेचे नेते वसंत मोरे यांचे चिरंजीव रुपेश, यास अल्पिया शेख या महिलेच्या नावाने विविध नंबरवरून व्हाट्सअप मेसेज करत तीस लाख रुपयाची खंडणीची मागणी करण्यात आली आहे. ही खंडणीची रक्कम पुण्यातील खराडी येथील युवान आयटी इथे थांबलेला इनोवा कारमध्ये ठेवा. असा व्हाट्सएपवर मेसेज करत धमकी दिली आहे. सदर, विवाह प्रमाणपत्रावर औरंगाबाद जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यातील वडगाव गावाच्या ग्रामसेवकाची सहीचे मॅरेज सर्टिफिकेट बनवून वसंत मोरे यांच्या मुलाला धमकी देण्यात आली आहे.
भारती पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल : वडील मनसेचे नेते असल्याने यापूर्वीसुद्धा रुपेश यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. त्यानंतर आता हा त्यांच्या बाबतीतला दुसरा प्रकार समोर आला असून, अशा प्रकारे सुद्धा कोणी आपल्या नावाने बनावट विवाह प्रमाणपत्र काढून धमकी देऊ शकतो. याचा चर्चा आता समाजात होताना दिसत आहे. आणि याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे. यासंदर्भात भारती पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस करत आहेत.
हेही वाचा : अर्थसंकल्पातून राज्याला काय? शिक्षण, सार्वजनिक आरोग्य, कृषी क्षेत्रासाठी भरीव तरतूदीची शक्यता