पुणे - कोंढव्यामध्ये अकराव्या मजल्यावरून खाली कोसळल्याने एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. मंगळवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला. कोंढवा खडी मशीन येथील पूल हौसिंग सोसायटीत ही घटना घडली. याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी याप्रकरणी तिघांना ताब्यात घेतले आहे. सागर चिलेवरी (वय 24) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.
हेही वाचा - देहू नगरीत तुकाराम बीज सोहळ्यानिमित्त प्रवेशद्वारावर आकर्षक विद्युत रोषणाई
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत चिलेवरी याने आरोपीकडून व्याजाने पैसे घेतले होते. त्यावरून त्यांच्यात वाद सुरू होता. दरम्यान, आज सकाळी आरोपी पैसे घेण्यासाठी चिलेवरी याच्याकडे आले होते. यावेळी त्यांच्यात परत वाद झाला आणि झटापटही झाली. यातच चिलेवरी 11 व्या मजल्यावरून खाली कोसळला.
दरम्यान घटनेची माहिती मिळताच कोंढवा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पैशाच्या वादातून झालेल्या झटापटीत हा खून झाल्याचाही संशयही व्यक्त करण्यात आला आहे. पोलिसांनी या प्रकरणी तिघांना ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरू आहे.
हेही वाचा - भीमाशंकरच्या कोकण कड्यावर पर्यावरणपूरक होळी साजरी