ETV Bharat / state

लॉकडाऊनमुळे बारामती बस आगाराला फटका, नऊ कोटींचे नुकसान - baramati corona update

बारामती आगारातून १०५ बस गाड्यांव्दारे ३६ हजार किलो मीटरचा प्रवास करुन दररोज सुमारे १४ लाख रुपयांचे उत्पन्न मिळत होते. तसेच उन्हाळी हंगामातून ही आगाराचे अतिरिक्त उत्पन्न वाढत असते. मात्र टाळेबंदीने उन्हाळी हंगाम ही ओसरल्याने महिन्याभरापासून बारामती आगाराचे एकंदरीत तब्बल ९ कोटी रुपयांचे उत्पन्न बुडाले आहे.

Damage of 9 crore to Baramati depot due to lockdown
लॉकडाऊनमुळे बारामती बस आगाराला फटका, नऊ कोटींचे नुकसान
author img

By

Published : May 7, 2020, 11:08 AM IST

बारामती (पुणे) - राज्यासह देशात कोरोनामुळे लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीला आता महिना उलटून गेला आहे. तेव्हापासून प्रवाशांची ने-आण करणाऱ्या लालपरीची सेवा पूरती ठप्प असून एसटीची चाके आगारातच रुतून बसली आहेत. महिनाभरापासून बस वाहतुक बंद असल्याने अगोदरच तोट्यात असलेल्या एसटी महामडंळाला कोरोनामुळे फटका बसला आहे.

बारामती आगारातून १०५ बस गाड्यांव्दारे ३६ हजार किलो मीटरचा प्रवास करुन दररोज सुमारे १४ लाख रुपयांचे उत्पन्न मिळत होते. तसेच उन्हाळी हंगामातून ही आगाराचे अतिरिक्त उत्पन्न वाढत असते. मात्र टाळेबंदीने उन्हाळी हंगाम ही ओसरल्याने महिन्याभरापासून बारामती आगाराचे एकंदरीत तब्बल ९ कोटी रुपयांचे उत्पन्न बुडाले आहे.

कोरोनाचा सर्वच क्षेत्रावर मोठा परिणाम झाला आहे. लागू असलेल्या टाळेबंदीत छोटे-मोठे उद्योगधंदे व्यापार सध्या पूर्णतः बंद पडले आहेत. शासनाला आर्थिक उत्पन्न मिळवून देणाऱ्या विविध विभागावर कोरोनाचा परिणाम झाल्याने मोठे उत्पन्न बुडत आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्याच्या दुष्टीने गर्दी टाळण्यासाठी टाळेबंदी हाच एकमेव पर्याय असल्याने सर्वच प्रवासी वाहतुक बंद करण्यात आली आहे. त्यामुळे महिन्याभरापासून लालपरीची चाके आगारातून हलली नाहीत.

बारामती आगराला ९ कोटींचा फटका-

बारामती आगरातून १०५ गाड्यांव्दारे ३६ हजार किलोमीटरचा प्रवास होत होता. यातून रोज १४ लाख रुपयांचे उत्पन्न मिळत होते. तसेच उन्हाळी हंगामात लांब पल्यावर जाणाऱ्या विशेष बस गाड्यातून २ महिन्यात सुमारे साडेचार कोटी उत्पन्न मिळत होते. मात्र टाळेबंदीमुळे बससेवा बंद असल्याने बारामती आगराला सुमारे ९ कोटी रुपयांचा फटका बसला आहे.

उन्हाळी हंगामही बुडल्यात जमा-

एप्रिल ते जून दरम्यानच्या २ महिन्यात शिर्डी, औरंगाबाद, सोलापूर, बीड आदी भागात जाणाऱ्या लांबपल्याच्या बस धावत होत्या. उन्हाळी हंगामात या बसव्दारे अतिरिक्त उत्पन्न मिळत होते. या २ महिन्यात आगाराला तब्बल साडेचार कोटी रुपयांचे उत्पन्न मिळत होते. मात्र टाळेबंदीमुळे बसवाहतुक बंद असल्याने नियमित फेऱ्यातून मिळणाऱ्या उत्पन्नासह उन्हाळी हंगामाचे उत्पन्न ही वाया गेले आहे.

टाळेबंदीमुळे बस गाड्या आगारातच थांबून आहेत. त्यामुळे रोजचे १४ लाखांच्या उत्पन्नासह उन्हाळी हंगामातून मिळणारे उत्पन्न वाया गेल्याने आगाराला सुमारे ९ कोटी रुपयांचा फटका बसला आहे, अशी माहिती बारामती आगार प्रमुख अमोल गोंजारी यांनी दिली.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.