ETV Bharat / state

येरवडा तुरुंगामधून देशातील पहिल्या 'जेल टुरिझम' उपक्रमाला सुरुवात - महात्मा गांधी येरवडा तुरुंग बंदिवास

राष्ट्रपिता महात्मा गांधी, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, सरदार वल्लभाई पटेल, नेताजी सुभाष चंद्र बोस, सरोजिनी नायडू, पंडित जवाहरलाल नेहरू, पंडित मोतीलाल नेहरू अशा अनेक महान स्वातंत्र्य सेनानींनी या येरवडा तुरुंगात कारावास भोगला. महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामध्ये झालेला ऐतिहासिक पुणे करार देखील या येरवडा तुरुंगाच्या प्रांगणात झाला होता. हा तुरुंग अशा अनेक ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार ठरला आहे.

पुणे येरवडा तुरुंग पर्यटन न्यूज
पुणे येरवडा तुरुंग पर्यटन न्यूज
author img

By

Published : Jan 26, 2021, 4:37 PM IST

पुणे - देशातल्या पहिल्या 'जेल टुरिझम'ला पुण्यातल्या येरवडा तुरुंग येथून सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रातील सर्वात मोठा तुरुंग म्हणून येरवडा तुरुंगाकडे पाहिले जाते. या तुरुंगाला तब्बल दीडशे वर्षांचा इतिहास आहे. ब्रिटिश राजवटीत या तुरुंगाची बांधणी केली गेली होती. स्वातंत्र्यपूर्व काळात या तुरुंगामध्ये भारताचे अनेक महान स्वातंत्र्य सेनानी ब्रिटिश राजवटीविरुद्ध लढताना या तुरुंगात बंदिस्त करण्यात आले होते.

पुणे : येरवडा तुरुंगात पर्यटन सुरू

हेही वाचा - प्रजासत्ताक दिनानिमित्त विठुरायाच्या मंदिरात 'तिरंगी' सजावट

येरवडा तुरुंगात अनेक स्वातंत्र्यवीरांना बंदिवास

राष्ट्रपिता महात्मा गांधी, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, सरदार वल्लभाई पटेल, नेताजी सुभाष चंद्र बोस, सरोजिनी नायडू, पंडित जवाहरलाल नेहरू, पंडित मोतीलाल नेहरू अशा अनेक महान स्वातंत्र्य सेनानींनी या येरवडा तुरुंगात कारावास भोगला. तसेच, महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामध्ये झालेला ऐतिहासिक पुणे करार देखील या येरवडा तुरुंगाच्या प्रांगणात झाला होता. या तुरुंगात महात्मा गांधींना बंदी म्हणून ठेवण्यात आले होते. त्या बराकीसमोर असलेल्या झाडाखाली महात्मा गांधी आणि बाबासाहेब आंबेडकर यांनी पुणे करारावर सही केली होती.

ऐतिहासिक घटनांचे साक्षीदार असलेल्या तुरुंगांचे पर्यटन

अशा ऐतिहासिक घटनांनी भारावलेल्या या येरवडा तुरुंगामध्ये आतापर्यंत सामान्य नागरिकांना प्रवेश नव्हता. मात्र, तुरुंगाचा एकंदरीत इतिहास पाहता या ऐतिहासिक वास्तू पाहण्याची संधी सर्वसामान्यांना उपलब्ध व्हावी, या दृष्टीने महाराष्ट्र सरकारने 'तुरुंग पर्यटन' ही संकल्पना पुढे करत आजपासून यासाठी सुरुवात केली आहे. तुरुंग पर्यटनानिमित्ताने येरवडा तुरुंगाच्या आतल्या भागात असलेल्या या ऐतिहासिक वास्तूंचा आढावा घेतला आहे, आमचे पुण्याचे प्रतिनिधी राहुल वाघ यांनी..

हेही वाचा - जळगावची समृद्धी संत बनली 'ऑल इंडिया परेड कमांडर', प्रजासत्ताक दिनी केले देशाचे नेतृत्व

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.