पिंपरी-चिंचवड - विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांची पोलिसांकडून कोरोना टेस्ट करण्यात येत आहे. गंभीर बाब म्हणजे यात अनेक व्यक्ती बाधित आढळत आहेत. त्यामुळे पोलिसांकडून सोशल डिस्टंन्सिंग नागरिकांनी पाळावा तसेच मास्क वापरावा, असे आवाहन सहाय्यक पोलीस आयुक्त सागर कवडे आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर अवताडे यांनी केले आहे.
रस्त्यावर फिरणाऱ्या नागरिकांची कोरोना टेस्ट -
पिंपरी-चिंचवड शहरात दररोज दोन हजरापेक्षा अधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळत आहेत. तर, अनेकांचा मृत्यू होत आहे. त्यामुळे आजपासून निर्बंध कडक करण्यात आले आहे. तसेच 'ब्रेक द चैन' या मोहिमेंतर्गत रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांची कोरोना टेस्ट केली जात आहे.
अनेक जण बाधित होम क्वारंटाईनचा मारला जातो शिक्का -
गंभीर बाब म्हणजे यात अनेक जण बाधित आढळत असून त्यांना सौम्य लक्षण असल्यास होम क्वारंटाईन राहण्याचे सांगण्यात येत आहे. तसा शिक्का त्यांच्या हातावर मारला जात आहे. ते नियमांचे पालन करतात का, याची शहानिशा पोलीस करणार असल्याचेदेखील अधिकारी सागर कवडे यांनी म्हटले आहे. दरम्यान ज्या व्यक्तीला जास्त लक्षण आहेत, अश्या व्यक्तींना कोविड सेंटर किंवा रुग्णालयात दाखल केल जात आहे. प्रत्येक व्यक्तीने मास्क आणि सोशल डिस्टन्सिंग पाळायला हवे, जेणेकरून बाधित व्यक्ती जवळ आल्यास आपल्याला संसर्ग होणार नाही, असे देखील कवडे यांनी म्हटले आहे.
हेही वाचा - ठाण्याच्या पॉईंटमनकडून माणुसकीचे दर्शन, बक्षीसातील निम्मी रक्कम दिली अंध मातेला