पुणे - शहरात मंगळवारी दिवसभरात ३०९८ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ झाली आहे. तर १६९८ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज पुण्यात कोरोनाबाधित ३१ रुग्णांचा मृत्यू झाला असून, ९ रुग्ण पुण्याबाहेरील आहेत. शहरात सध्या ५५५ क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रुग्णसंख्या २ लाख ४० हजार ८३४ इतकी झाली आहे. तर सध्या पुण्यातील अॅक्टिव्ह रुग्ण संख्या २४ हजार ४४० इतकी झाली आहे. आजपर्यत एकूण ५०९० रुग्णांचा मृत्यू झाला असून, आजपर्यंतचे एकूण २११३०४ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. दरम्यान, आज शहरात ११ हजार ३१० नमुन्यांची (स्वॅब) तपासणी करण्यात आली आहे.
जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्ण ३९ हजार ३५ .
दुसरीकडे पुणे जिल्ह्याचा विचार केला तर पुणे जिल्ह्यात मंगळवारी ५ हजार ४०८ रुग्णांची वाढ झाली आहे. जिल्ह्यात सध्या अॅक्टिव्ह रुग्ण ३९ हजार ३५ इतके आहेत. तर आजपर्यत जिल्ह्यात कोरोनाबाधित एकूण ९ हजार ४७७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण २.०२ टक्के इतके आहे तर बरे होणाऱया रुग्णांचे प्रमाण ८९.६७ टक्के आहे.
पुणे विभाग
पुणे विभागाचा विचार केला तर ६ लाख २७ हजार ३०२ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ६ लाख ८९ हजार ३१५ झाली आहे. तर अॅक्टिव्ह रुग्ण संख्या ४५ हजार २२९ इतकी आहे. कोरोनाबाधित एकूण १६ हजार ७८४ रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण २.४३ टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण ९१ टक्के आहे.
सातारा जिल्हा
सातारा जिल्ह्यातील कोरोनाबाधित एकूण ६२ हजार २९२ रुग्णांपैकी ५८ हजार १८९ रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. अॅक्टिव्ह रुग्ण संख्या २ हजार २२३ आहे. कोरोनाबाधित एकूण १ हजार ८८० रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
हेही वाचा - व्हायरल व्हिडिओमुळे जुळून येती रेशिमगाठी! गाजियाबादच्या रेहानानं अजिमला घातली लग्नाची मागणी
सोलापूर जिल्हा
सोलापूर जिल्ह्यातील कोरोनाबाधित एकूण ५६ हजार ६३२ रुग्णांपैकी ५२ हजार ७१ रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. अॅक्टिव्ह रुग्ण संख्या २ हजार ६६३आहे. कोरोनाबाधित एकूण १ हजार ८९८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सांगली जिल्हा
सांगली जिल्ह्यातील कोरोनाबाधीत एकूण ४९ हजार ६२६ रुग्णांपैकी ४७ हजार ५९ रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. अॅक्टिव्ह रुग्ण संख्या ७९४ आहे. कोरोनाबाधित एकूण १ हजार ७७३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कोल्हापूर जिल्हा
कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोनाबाधित एकूण ५१ हजार २८७ रुग्णांपैकी ४९ हजार १७ रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. अॅक्टिव्ह रुग्ण संख्या ५१४ आहे. कोरोनाबाधित एकूण १ हजार ७५६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
आज झालेली वाढ
कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये ७ हजार २५७ ने वाढ झाली आहे. सातारा जिल्ह्यात ३२७, सोलापूर जिल्ह्यात ३७१, सांगली जिल्ह्यात ७१ तर कोल्हापूर जिल्ह्यात ८० अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.
हेही वाचा - गृहमंत्री अनिल देशमुख मुख्यंमंत्र्यांच्या भेटीसाठी वर्षावर दाखल