बारामती (पुणे) - अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून वारंवार बलात्कार करून ती गरोदर राहिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी प्रतीक रासकर (रा. बारामती) असे आरोपीचे नाव आहे. त्याच्यावर बारामती शहर पोलीस ठाण्यात अपहरण, बलात्कारासह बाललैंगिक प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मे २०२० ते १० नोव्हेंबर २०२० -
शहर पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, पीडित अल्पवयीन मुलगी ही पुण्यातील शास्त्रीनगर येरवडा परिसरातील आहे. या घटनेप्रकरणी पीडितेने येरवडा येथे फिर्याद दिली होती. ही फिर्याद पुढील तपासासाठी बारामती पोलिसांकडे वर्ग झाली आहे. या घटनेप्रकरणी दिलेल्या फिर्यादीत नमूद केल्यानुसार मे २०२० ते १० नोव्हेंबर २०२० या दरम्यान बारामतीतील वेगवेगळ्या लॉजवर ही घटना घडली.
पीडित मुलगी अल्पवयीन असताना आरोपीने तिला लग्नाचे आमिष दाखवत बारामतीतील लॉजवर नेत तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. त्यातून ती गरोदर असल्याचे समोर आले आहे.
हेही वाचा - मुंबईत कोरोना रुग्ण संख्येत घट; 645 नवे रुग्ण, 19 रुग्णांचा मृत्यू