ETV Bharat / state

इंदापूर विधानसभा काँग्रेस पक्ष स्वबळावर लढवणार - विजय वडेट्टीवार - congress latest news

सध्या महाराष्ट्रामध्ये काँग्रेस पक्षाला जोरदार पाठिंबा मिळत असून काँग्रेस पक्ष मजबुतीने उभा होत आहे. त्यामुळे पुढील विधानसभेला काँग्रेस पक्ष नंबर एकचा पक्ष राज्यात राहील, असे सूतोवाच मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केले.

author img

By

Published : Aug 31, 2021, 5:31 PM IST

Updated : Aug 31, 2021, 5:40 PM IST

इंदापूर - इंदापूर विधानसभेची जागा काँग्रेस पक्ष स्वबळावर लढवणार, अशी प्रतिक्रिया काँग्रेस नेते आणि राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे. मंत्री वडेट्टीवार सोलापूर दौऱ्यावर असता इंदापूर येथे काही वेळ थांबले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

'पक्षाची ताकद वाढवणार'

ते म्हणाले, की इंदापूर विधानसभा काँग्रेस शंभर टक्के लढवणार आहे. परंतु यासाठी बराच कालावधी बाकी आहे. स्वतःच्या पक्षाची ताकद वाढवणे, पक्ष मोठा करणे हे आमचे कर्तव्यच आहे. प्रदेशाध्यक्ष ज्या पद्धतीने कामाला लागले आहेत ती भूमिका आमची दखील असणार आहे. आज जरी कठीण परिस्थिती असली तरीदेखील हायकमांडकडे तशीच मागणी आहे. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये आमची भूमिका ठरलेली आहे.

'क्रमांक एकवर राहील काँग्रेस'

सध्या महाराष्ट्रामध्ये काँग्रेस पक्षाला जोरदार पाठिंबा मिळत असून काँग्रेस पक्ष मजबुतीने उभा होत आहे. त्यामुळे पुढील विधानसभेला काँग्रेस पक्ष नंबर एकचा पक्ष राज्यात राहील, असे सूतोवाच मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केले. यावेळी विधान परिषदेचे माजी आमदार रामराव वडकुते, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष स्वप्नील सावंत, तालुका काँग्रेस उपाध्यक्ष आबासाहेब निंबाळकर, इंदापूर शहराध्यक्ष चमन बागवान, डॉ. संतोष होगले, इंदापूर विद्यार्थी संघटना अध्यक्ष शंभूराजे साळुंखे, पुणे जिल्हा सरचिटणीस जकीर काजी, निवास शेळके, महादेव लोंढे, दत्तात्रेय देवकर यांसह अन्य उपस्थित होते.

Last Updated : Aug 31, 2021, 5:40 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.