पुणे - गेल्या 23 एप्रिलपासून पुण्यातील जहांगीर रुग्णालयात कोरोनावर उपचार घेणाऱ्या राजीव सातव यांची प्रकृती पुन्हा एकदा खालावली आहे. 19 एप्रिलला सातव यांना कोरोनाची लक्षणे जाणवली होती. त्यानंतर 23 एप्रिलपासून त्यांच्यावर उपचार सुरू आहे. त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. दरम्यान इतके दिवस त्यांची प्रकृती सुधारत असतानाच शुक्रवारी सातव यांना पुन्हा त्रास झाला आणि त्यांची प्रकृती पुन्हा एकदा खालावली.
हेही वाचा - 'म्युकरमायकोसिसचा महात्मा फुले जन आरोग्य योजनेत समावेश'
सातव यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत असून त्यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आल्याने ते कोरनामुक्त झाल्याचे डॉक्टरांनी काही दिवसांपूर्वीच सांगितले होते. त्यांना लवकरच डिस्चार्ज देण्यात येईल, असेही डॉक्टरांनी सांगितले होते. मात्र, सातव यांना झालेल्या न्युमोनियाचा संसर्ग कायम राहिला आणि त्यांची प्रकृती पुन्हा एकदा खालावली, त्यामुळे त्यांना पुन्हा एकदा व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे.
स्वतः राहुल गांधी राजीव सातव यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी जहांगीर रुग्णालयातील डॉक्टरांना फोन करून सातव यांच्या प्रकृतीविषयी माहिती जाणून घेतली होती. तर, दुसरीकडे काँग्रेसचे वरिष्ठ नेतेही जहांगीर हॉस्पिटलमध्ये येऊन सातव यांच्यावर सुरू असलेल्या उपचारांची माहिती घेत आहेत.
हेही वाचा - ईद आणि अक्षयतृतीयेनिमित्त विद्यार्थ्यांना शिरखुर्मा व आमरसाच्या भोजनाची मेजवानी