ETV Bharat / state

प. भीमसेन जोशींनी संगीताच्या माध्यमातून समाजाची सेवा केली - पवार - पुणे जिल्हा लेटेस्ट न्यूज

'पं. भीमसेन जोशी हे कर्नाटकातून महाराष्ट्रात आले. राजकारणात असताना अनेकदा मराठी कानडी वाद समोर येतात. मात्र संगीतात हा वाद मिटवून मराठी आणि कानडीला एकसंध करण्याची कामगिरी पं. भीमसेन जोशी यांनी करून दाखवली आहे. पंडितजींनी कायमच संगीताच्या माध्यमातून समाजाची सेवा केली आहे', अशा भावना राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष व ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी व्यक्त केल्या आहेत.

पं. भीमसेन जोशी यांचा जन्मशताब्दी सोहळा
पं. भीमसेन जोशी यांचा जन्मशताब्दी सोहळा
author img

By

Published : Feb 6, 2021, 8:57 PM IST

Updated : Feb 6, 2021, 9:09 PM IST

पुणे- 'पं. भीमसेन जोशी हे कर्नाटकातून महाराष्ट्रात आले. राजकारणात असताना अनेकदा मराठी कानडी वाद समोर येतात. मात्र संगीतात हा वाद मिटवून मराठी आणि कानडीला एकसंध करण्याची कामगिरी पं. भीमसेन जोशी यांनी करून दाखवली आहे. पंडितजींनी कायमच संगीताच्या माध्यमातून समाजाची सेवा केली आहे', अशा भावना राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष व ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी व्यक्त केल्या. भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांची जन्मशताब्दी दि. ४ फेब्रुवारीपासून सुरू झाली असून, त्यानिमित्त आर्य संगीत प्रसारक मंडळाने ‘अभिवादन’ या सांगीतिक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. हा कार्यक्रम ६ आणि ७ फेब्रुवारीला गणेश कला क्रीडा मंच येथे सुरु असून, कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी पवार बोलत होते.

पंडितजींनी नवीन कलाकारांना नेहमीच प्रोत्साहित केले

यावेळी जागतिक कीर्तीचे सुलेखनकार अच्युत पालव यांनी डिझाईन केलेल्या विशेष 'मोनोग्राम'चे अनावरण करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर, भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेचे अध्यक्ष विनय सहस्रबुद्धे, पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, पंडितजींचे पुत्र व मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी उपस्थित होते. यावेळी बोलताना पवार म्हणाले की, "कोरोनाचे संकट नसते तर आज हा जन्मशताब्दी कार्यक्रम आपल्याला आगळ्यावेगळ्या स्वरुपात बघायला मिळाला असता. पंडितजींविषयी सर्वांनाच आस्था आहे. त्यांनी सवाई गंधर्व संगीत महोत्सवाच्या माध्यमातून नवीन कलाकारांना नेहमीच प्रोत्साहित केले. ती परंपरा आजही कायम आहे याचा आनंद वाटतो. जोवर संगीतप्रेमी आहेत तोवर पं. भीमसेन जोशी व लता मंगेशकर या दोन भारतरत्नांचे नाव कायमच घेतले जाईल. त्यांचे स्वर कायमच लोकांच्या मनात राहतील. ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या निवासस्थानी पंडितजींची मैफल ऐकण्याची संधी काही वेळा मिळाली. तसेच एकदा आमच्या निवासस्थानी देखील हा योग जुळून आला होता. त्यांच्या व्यक्तिमत्वाचा ओलावा कायमच जाणवत असल्याचे देखील पवारांनी यावेळी म्हटले.

पंडितजींनी तानसेनांबरोबर कानसेनही घडवले

पंडितजींनी तानसेनांबरोबर कानसेनही घडवले

तर प्रकाश जावडेकर यांनी आपल्या भाषणात बोलताना म्हटले की "पंडितजी म्हणजे संगीतातील अखेरचा शब्द, त्यांनी तानसेनांबरोबर कानसेनही घडविण्याचे काम केले. ज्या देशात कलेचा सन्मान होतो तो देश पुढे जातो. त्यांना मिळालेला भारतरत्न म्हणजे संगीताचा सर्वोच्च सन्मान आहे. कलाकारांचा सन्मान म्हणजे देशाची मन उंचवण्याचा टप्पा असतो. त्यांचा तसेच अनेक मान्यवरांचा जो खजिना दूरदर्शन व आकाशवाणीकडे आहे तो रसिकांना सहज उपलब्ध होण्यासाठी आम्ही विशेष प्रयत्न करत आहोत. आकाशवाणीचे राष्ट्रीयस्तरावरील संगीत संमेलन या जन्मशताब्दी सोहळ्याच्या निमित्ताने यापुढे भारतरत्न पं. भीमसेन जोशी संगीत संमेलन म्हणून सादर करण्यात येईल. असेही यावेळी जावडेकर म्हणाले. उद्घाटन सोहळ्यानंतर पंडितजींचे ज्येष्ठ शिष्य पं. उपेंद्र भट यांच्या गायनाने पहिल्या सत्रातील सांगीतिक मैफलीची सुरुवात झाली. पंडित भीमसेन जोशी यांच्या आवडीच्या राग पुरीया या सायंकाळच्या रागाने त्यांनी गायनाला सुरुवात केली.

Last Updated : Feb 6, 2021, 9:09 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.