ETV Bharat / state

क्वारंटाईन सेंटरमध्ये नागरिकांचा गोंधळ; महानगर पालिका सुविधा देत नसल्याचा आरोप - pune municipal corporation lateat news

हा सर्व प्रकार सामाजिक कार्यकर्ते मनोज कांबळे यांनी समोर आणला आहे. दोन दिवसांपूर्वी देखील नागरिकांनी असाच बाहेर पडण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, अधिकाऱ्यांनी समजावून त्यांना पुन्हा गैरसोय होणार नाही म्हणून गप्प केले, अस तेथील नागरिकांनी सांगितले आहे. परंतु, या गोंधळामुळे अनेक जणांनी गर्दी केली असून सोशल डिस्टसिंगचा फज्जा उडाला आहे.

citizens rada in quarantine center in pune
महानगर पालिका सुविधा देत नसल्याचा आरोप करत क्वारंटाईन सेंटरमध्ये नागरिकांचा गोंधळ
author img

By

Published : Jun 9, 2020, 5:57 PM IST

पुणे - क्वारंटाईन सेंटरमध्ये असलेल्या शेकडो नागरिकांनी महानगर पालिका प्रशासन सुविधा पुरवत नसल्याचा आरोप करत गोंधळ घातला. ही घटना आज दुपारी पिंपरी-चिंचवडमध्ये घडली असून नागरिक बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होते. मात्र, गेटला कुलूप असल्याने त्यांना बाहेर पडता आलं नाही. दरम्यान, महानगर पालिकेच्या प्रशासनाने त्यांना वेळेवर जेवण मिळत आहे, असे स्पष्टीकरण दिले आहे.

क्वारंटाईन सेंटरमध्ये नागरिकांचा गोंधळ; महानगर पालिका सुविधा देत नसल्याचा आरोप
पिंपरी-चिंचवडच्या मोशी परिसरात क्वारंटाईन सेंटर असून तिथे करोना संशयितांना ठेवलं जाते. एकूण २१० नागरिक त्या ठिकाणी क्वारंटाईन करण्यात आलेले आहेत. मात्र, तेथील नागरिकांचे अहवाल हे उशिरा येत असून जेवण आणि इतर सुविधा मिळत नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. आज सकाळी नागरिकांचा संताप झाला आणि गोंधळ करत सेंटर बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. मात्र, गेटला कुलूप असल्याने ते बाहेर पडू शकले नाहीत. हा सर्व प्रकार सामाजिक कार्यकर्ते मनोज कांबळे यांनी समोर आणला आहे. दोन दिवसांपूर्वी देखील नागरिकांनी असाच बाहेर पडण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, अधिकाऱ्यांनी समजावून त्यांना पुन्हा गैरसोय होणार नाही म्हणून गप्प केले, अस तेथील नागरिकांनी सांगितले आहे. परंतु, या गोंधळामुळे अनेक जणांनी गर्दी केली असून सोशल डिस्टसिंगचा फज्जा उडाला आहे.

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.