ETV Bharat / state

दसऱ्याच्या मुहूर्तावर वाहन खरेदीकडे नागरिकांचा कल, पुणे आरटीओत 6,455 वाहनांची नोंद

दसऱ्याच्या मुहूर्तावर वाहन खरेदीला प्राधान्य देणाऱ्या नागरिकांनी गेल्या आठ दिवसात 3 हजार 751 दुचाकी खरेदी केल्या आहेत. 2 हजार 339 मोटर कार तर, 197 व्यावसायिक वाहने खरेदी केल्याची नोंद करण्यात आली आहे. अशाप्रकारे एकूण 6 हजार 455 वाहनांची नागरिकांनी खरेदी केली आहे.

दसऱ्याच्या मुहूर्तावर वाहन खरेदी करण्याकडे नागरिकांचा कल

author img

By

Published : Oct 26, 2020, 4:55 PM IST

पुणे - साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या दसऱ्याच्या मुहूर्तावर वाहन खरेदीला नागरिकांनी याहीवर्षी प्राधान्य दिले आहे. पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाने याबाबतची माहिती दिली असून मागील आठ दिवसात तब्बल 6 हजार 455 वाहनांची नागरिकांनी खरेदी केल्याची नोंद करण्यात आली आहे. या वाहन खरेदीतून आरटीओ कार्यालयास कोट्यवधी रुपयांचा महसूल मिळाला आहे.

सणाच्या मुहूर्तावर वाहन खरेदीला प्राधान्य देणाऱ्या नागरिकांनी गेल्या आठ दिवसात 3 हजार 751 दुचाकी खरेदी केल्या आहेत. तर, 2 हजार 339 मोटर कार खरेदी केल्या आहेत. 197 व्यावसायिक वाहने खरेदी केल्याची नोंद करण्यात आली आहे. अशाप्रकारे एकूण 6 हजार 455 वाहनांची नागरिकांनी खरेदी केली आहे.

दसऱ्याच्या मुहूर्तावर वाहन खरेदीकडे नागरिकांचा कल

मागील वर्षी दसऱ्यानिमित्त नागरिकांनी 7 हजार 822 वाहने खरेदी करण्यात आली होती. यामध्ये ग्राहकांनी 4 हजार 966 दुचाकींची खरेदी केली होती. यावर्षी यात घट झाली आहे. यंदा एकूण 3 हजार 751 दुचाकींची खरेदी करण्यात आली. त्याचबरोबर गेल्यावर्षी 2 हजार चारचाकी वाहनांची खरेदी करण्यात आली. यावर्षी यामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होऊन सुमारे 2 हजार 339 चारचाकी वाहनांची खरेदी करण्यात आली आहे.

रिक्षा खरेदीमध्ये घट -

गेल्यावर्षी फक्त 321 रिक्षांची खरेदी करण्यात आली होती. यावर्षी यामध्ये घट होऊन 43 रिक्षांची खरेदी करण्यात आल्या. मालवाहू वाहनांच्या खरेदीमध्ये यावर्षी घट दर्शविण्यात आली. गेल्यावर्षी 254 मालवाहू वाहने खरेदी करण्यात आली होती. तर, यावर्षी 197 मालवाहू वाहनांची खरेदी करण्यात आली आहे.

दसऱ्यानिमित्त अनेक वाहन उत्पादक कंपन्यांनी ग्राहकांसाठी विशेष ऑफर दिल्या होत्या. कमी डाऊन पेमेंट, नोंदणी आणि विम्यातील सवलत यामुळे ग्राहकांचा कल यावर्षी वाहन खरेदीमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढलेला दिसून आला. यामध्ये प्रामुख्याने दुचाकी आणि चारचाकी वाहनांच्या खरेदीला ग्राहकांनी पसंती दिली.

हेही वाचा - थकीत वेतन द्या; एसटी कर्मचाऱ्यांचा आक्रोश आंदोलनाचा इशारा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.