ETV Bharat / state

हडपसर परिसरातून आणखी एका चिमुरड्याचे अपहरण, अपहरणकर्त्या दोन महिलांचा शोध सुरू - पुणे क्राईम न्यूज

हडपसर परिसरातूनच आणखी एका मुलाचे अपहरण झाले आहे. दोन महिलांनी हे अपहरण केले आहे.

पुण्याच्या हडपसर परिसरातून आणखी एका चिमुरड्याचे अपहरण, दोन महिलांचा शोध सुरू

author img

By

Published : Nov 23, 2020, 10:32 PM IST

पुणे - काही दिवसांपूर्वीच पुण्यातील हडपसर परिसरातील एका चार महिन्याचे बाळाचे अपहरण करण्यात आले होते. ही घटना ताजी असतानाच हडपसर परिसरातूनच आणखी एका मुलाचे अपहरण झाले आहे. दोन महिलांनी हे अपहरण केले आहे. आज पहाटेच्या सुमारास हा सर्व प्रकार घडला. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला असून पोलीस अपहरणकर्त्या महिलांचा शोध घेत आहेत.

याप्रकरणी शर्मिला निलेश काळे (वय 22) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या एक वर्षाच्या मुलाचे अपहरण करण्यात आले आहे. त्यानुसार अज्ञात महिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेला 2 मुले आहेत. त्या मुळच्या इंदापूर तालुक्यातील रहिवासी आहेत. पतीसोबत वाद झाल्यानंतर त्या हडपसर येथील गाडीतळ पुलाखाली राहत होत्या. त्या ठिकाणी त्यांच्या ओळखीच्या काही महिला राहत होत्या. या पुलाखाली राहणारे सर्व नागरिक मोलमजुरी करून उपजीविका भागवत असतात.

दरम्यान फिर्यादी रात्री गाढ झोपेत असताना सोमवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास दोन महिला पायी चालत त्या ठिकाणी आल्या. आणि त्यांनी फिर्यादी यांच्याजवळ झोपलेल्या त्यांच्या एक वर्षाच्या मुलाला उचलून घेऊन गेल्या. काही वेळा नंतर हा सर्व प्रकार उघडकीस आल्यानंतर फिर्यादीनी संपूर्ण गाडीतळ परिसर पिंजून काढला परंतु बाळ सापडले नाही. त्यानंतर त्यांनी हडपसर पोलीस स्टेशन गाठत बाळ हरवल्याची तक्रार दिली. हडपसर पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल करत या मुलाचा शोध सुरू केला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.