ETV Bharat / state

Eknath Shinde On MPSC : हित लक्षात घेऊन एमपीएससीचा निर्णय; विद्यार्थ्यांच्या आंदोलनात राजकारण आणण्याचा प्रयत्न - मुख्यमंत्री

एमपीएससीचे नवीन नियम 2025 पासून लागू करण्याची मागणी मान्य करण्यात आली आहे. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आयोगाने घेतलेल्या निर्णयाचे स्वागत केले आहे. विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन आम्ही हा निर्णय घेतला आहे असे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितले.

Eknath Shinde On MPSC
Eknath Shinde On MPSC
author img

By

Published : Feb 23, 2023, 9:15 PM IST

विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन एमपीएसचा निर्णय

पुणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एमपीएससी आयोगाने घेतलेल्या निर्णयाचे स्वागत केले आहे. विद्यार्थी आंदोलन करत असताना मी थेट त्यांच्याशी बोलायचो. याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही विद्यार्थ्यांशी चर्चा केली. सरकारही विद्यार्थ्यांच्या बाजूने आहे. सरकारने एमपीएससी आयोगालाही विनंती केली होती. आज विद्यार्थ्यांच्या बाजूने घेतलेल्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो, असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

  • Election Commission is an independent body which takes decisions on merit. Our government has been formed under the rules: Maharashtra CM Eknath Shinde on Sharad Pawar's statement alleging BJP of misuse of power over EC decision on Sena pic.twitter.com/Ner2XDZLRq

    — ANI (@ANI) February 23, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन निर्णय : विद्यार्थ्यांच्या या आंदोलनात काही लोक राजकारण आणत होते. याला राजकीय रंग देण्याचा त्यांचा प्रयत्न होता. महाविकास आघाडीच्या काळात हा निर्णय घेण्यात आला. पण ते आमच्या सरकारशी हा निर्णय जोडला जात होता. विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन आम्ही हा निर्णय घेतला आहे असे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितले. हा निर्णय कोणाच्या भेटीतून किंवा बैठकीतून झालेला नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांची मागणी होती ती लक्षात घेऊन आम्ही तातडीने मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेतला. आज आयोगानेही त्यांचा निर्णय मान्य केला आहे.

लोकशाहीत बहुमत महत्त्वाचे : निवडणूक आयोगाच्या निर्णयावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी टीका केली आहे. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विचारले असता ते म्हणाले की, शरद पवार मोठे नेते आहेत. पण निवडणूक आयोग ही स्वायत्त संस्था आहे. त्याला स्वतंत्र अधिकार आहेत. त्यातून घेतलेला निर्णय गुणवत्तेवर घेण्यात आला आहे. लोकशाहीत बहुमत महत्त्वाचे असते असे मत शिंदे यांनी व्यक्त केले आहे.

पोटनिवडणुका मोठ्या फरकाने जिंकू : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गेल्या दोन दिवसांपासून पुण्यात आहेत. याबाबत विचारणा केली असता त्यांनी पुण्यात असल्याचे सांगितले. रात्री उशिरा मी आमच्या पक्ष कार्यालयात गेलो. आज केसरी वाड्याला भेट द्यावी असे वाटले. म्हणूनच मी भेट द्यायला आलो असे शिंदे यावेळी म्हणाले. कसबा, चिंचवड पोटनिवडणुका मोठ्या फरकाने जिंकू. कसबा हा आमचा किल्ला आहे. ही निवडणूक आम्ही जिंकणार आहोत. कसबा मतदारसंघात काही प्रश्न आहे. मुक्ता टिळक, आजारी असताना त्यांनी मला निवेदन दिले होते. आम्ही त्यावर काम करत आहोत असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

2025 पासून नविन आभ्यासक्रम एमपीएससीचे नवीन नियम 2025 पासून लागू करण्याची मागणी गेल्या काही महिन्यांपासून विद्यार्थी करत आहेत. त्यासाठी गेल्या 4 दिवसांपासून विद्यार्थ्यांनी पुण्यात उपोषणही सुरू होते. आज यावर आयोगाने निर्णय घेत 2025 पासून नविन आभ्यासक्रमाची अंमलबजावणी करण्यात येईल असे म्हटले आहे.

हेही वाचा - MPSC : विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी; एमपीएससीचा नवीन अभ्यासक्रम 2025 पासून लागू

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.