पुणे : तुम्हाला पूजनीय असलेल्या सरस्वतीचे आम्हा उपेक्षित, दलित, वंचितांच्या शिक्षणामध्ये काहीही योगदान नसल्याने आम्ही सरस्वतीचे पूजन मान्य करीत नाही. (controversial statement on Saraswati) त्यापेक्षा महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, भाऊराव पाटील यांनी शिक्षणाची गंगा दारोदारी नेली, आणि गावागावापर्यंत नेली ते आमच्यासाठी पूजनीय आहेत, असे मत ज्येष्ठ नेते आणि अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे संस्थापक-अध्यक्ष छगन भुजबळ (Chagan Bhujbal) यांनी व्यक्त केले.
समता पुरस्कार : अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने आज महात्मा फुले यांची १३२ वी पुण्यतिथी आणि समता दिनानिमित्त यंदाचा 'समता पुरस्कार' ज्येष्ठ कवी, समीक्षक डॉ. यशवंत मनोहर यांना ज्येष्ठ नेते आणि अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे संस्थापक-अध्यक्ष छगन भुजबळ यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला, त्यावेळी भुजबळ बोलत होते. रुपये एक लाख, महात्मा फुले पगडी, मानपत्र, शाल आणि स्मृतीचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
यावेळी
पुन्हा एकदा वादग्रस्त विधान : बोलताना छगन भुजबळ म्हणाले की, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, भाऊराव पाटील यांचं शिक्षणातील यागदान मान्य आहे. मात्र, सरस्वतीचं शिक्षणात प्रत्यक्ष काय योगदान... ओबीसी समाजाच्या मागण्यांसाठी आपले समाज बांधवच एकत्र येत नाहीत, ही शोकांतिका आहे. सहा डिसेंबरला मुंबईत लाखोंच्या संख्येने पोहोचणाऱ्या अनुयायांना मुंबईत या आणि आपल्या महामानवाला वंदन करा, हे सांगावे लागत नाही.
तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करण्यासाठी रायगडावर मोठ्या संख्येने शिवभक्त जमतात, त्यांना देखील सांगावे लागत नाही. मग आपल्याच समाजातील लोकांमध्ये ही उदासीनता का दिसून येते, हे कोडे मला न सुटणारे आहे. सरकार कोणाचेही असो महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्याशी संबंधित कोणताही विषय असला, तरी त्यात अनेक अडचणींना सामोरे जावे लागते आणि अशा अडचणीच्या वेळी ज्या प्रमाणात समाजाने पाठीशी उभे राहिले पाहिजे, त्या प्रमाणात आपला समाज पाठीशी उभा राहात नाही.