पुणे - अत्यावश्यक सेवा वगळून दुकाने सुरू ठेवणाऱ्या पिंपरी-चिंचवड शहरातील ऐकूण १०२ जनांवर कारवाई केल्याची माहिती समोर आली आहे. ही आकडेवारी केवळ पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील असून आकडे वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. सर्वाधिक चिखली पोलीस ठाण्याच्या अंतर्गत २३ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात गर्दी टाळण्यासाठी अत्यावश्यक सेवा वगळून सर्व दुकाने बंद करण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र, अनेकांनी हे आदेश मानले नसून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची वेळ पोलिसांवर आली आहे. पिंपरी-चिंचवड शहरात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. त्यांच्यावर यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय आणि भोसरी येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात आत्तापर्यंत १९ रुग्ण आढळले आहेत.
कोणत्या पोलीस ठाण्यांतर्गत किती गुन्हे दाखल ते खालील प्रमाणे -
चिंचवड पोलीस ठाणे - ०४, चिखली पोलीस ठाणे-२३, सांगवी पोलीस ठाणे- २०, देहूरोड पोलीस ठाणे- २०, भोसरी एमआयडीसी- ०६, भोसरी पोलीस ठाणे- ०२, निगडी पोलीस ठाणे- ०६, आळंदी पोलीस ठाणे- ०२, दिघी पोलीस ठाणे- ०२, हिंजवडी पोलीस ठाणे- ०७, शिरगाव पोलीस चौकी- ०१, रावेत पोलीस चौकी-०२, म्हाळुंगे पोलीस चौकी- ०१, तळेगाव दाभाडे पोलीस ठाणे- ०६ असे एकूण १०२ जनांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
हेही वाचा - पुण्यात सोशल डिस्टंन्सिंग नियम होणार काठोर; जिल्हाधिकाऱ्यांची माहिती