ETV Bharat / state

'अमित शाह व पवारांची भेट इतकी निवांत का झाली याबाबत मी ही अनभिज्ञ'

रविवारी(२८ मार्च) राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट झाल्याची माहिती समोर येत आहे. ही भेट नक्की झाली की नाही आणि झाली तर का झाली, याबाबत अनेक चर्चा सुरू झाल्या आहेत.

Chandrakant Patil
चंद्रकांत पाटील
author img

By

Published : Mar 29, 2021, 12:41 PM IST

पुणे - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट झाली, अशी चर्चा आहे. शरद पवार एका कार्यक्रमासाठी अहमदाबादला गेले होते. अमित शाह हेदेखील प्रवासातून घरी गेले होते. त्यामुळे त्यांची भेट झाली असेल याबद्दल दुजोरा मिळत आहे. परंतु, ही भेट झालीच नाही असे सांगण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात स्पर्धा लागली आहे. यातूनच भेट झाली आहे, असे दिसून येते. मात्र, या बैठकीबाबत आणि त्यांच्यातील चर्चेबाबत मी देखील अनभिज्ञ असल्याचे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. चंद्रकांत पाटील यांनी आज(सोमवार) पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची भेट घेऊन आपल्या मतदारसंघातील काही प्रश्नांवर चर्चा केली. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

प्रत्येक भेट राजकारणासाठी नसते -

अशा प्रकारच्या भेटी नियमितपणे होत असतात. राजकारणा व्यतिरिक्तही आपण भेटले पाहिजे. राजकारण राजकारणाच्या जागी आणि मैत्रीचे संबंध आपल्या जागी, असे भारतीय संस्कृती आपल्याला सांगते. परंतु, अलीकडच्या काळात महाराष्ट्रत अशा भेटीगाठी कमी झाल्या आहेत. विरोधक आणि सत्ताधारी हे वैऱ्यांसारखे वागत आहेत. त्यामुळे पवार आणि शाह यांच्या भेटीला देखील संशयाच्या नजरेने पाहिले जात आहे. भेट झाली म्हणजे ती राजकीय चर्चेसाठीच झाली असे म्हणता येणार नाही, असे पाटील म्हणाले.

भेटीबाबतचे अनेक प्रश्न अनुत्तरीतच -

अमित भाईंच्या 'अशा भेटी जाहीरपणे सांगायच्या नसतात' या वाक्यामुळे भेट झाली असावी असे मला वाटते. अन्यथा अमित भाई इतके शूर आहेत की त्यांनी स्पष्टपणे भेट झाली नाही असे सांगितले असते. त्यांच्या या भेटीत कुठलेही राजकीय संकेत नाहीत. अमित शाह यांना भेटण्याची वेळ ही रात्री अकरानंतरच असते. परंतु, शरद पवारांची भेट इतकी निवांत का झाली ? अहमदाबादमध्येच का झाली? एका उद्योगपतीच्या घरी का झाली? हे सर्व प्रश्न अनुत्तरित आहेत. तुमच्या इतकाच मीही याबाबत अनभिज्ञ आहे, असे पाटील यांनी सांगितले.

राष्ट्रवादीसोबत जाण्याची वेळ आलीच तर तुमची राष्ट्रवादी काँग्रेससोबत जाण्याची तयारी आहेत का ?असा प्रश्न विचारला असता चंद्रकांत पाटील म्हणाले, मी एक सच्चा स्वयंसेवक, सच्चा कार्यकर्ता आहे. त्यामुळे पक्षश्रेष्ठी ठरवतील ते मान्य करायचे असते आणि तेच पक्षाच्या हिताचे असते. अमित शाह, जेपी नड्डा, नरेंद्र मोदी जो काही निर्णय घेतील तो आम्हा सर्वांना मान्य असेल.

हेही वाचा - एनआयएकडून सचिन वाझेंना घेऊन मिठी नदीवर केली तपासणी; सीपीयू आणि डीव्हीआर केला जप्त

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.