पुणे - गेल्या काही दिवसांपासून भाजपच्या पंकजा मुंडे, एकनाथ खडसे हे पक्षातील अंतर्गत कारणांमुळे नाराज असल्याच्या चर्चा सुरू होत्या. तर, नुकतेच एकनाथ खडसे यांनी आपण नाराज नसल्याचे म्हणाले होते. यावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
काही दिवसांआधी भाजपचे नेते एकनाथ खडसे आणि पंकजा मुंडे हे पक्ष सोडून जाण्याच्या मार्गावर असल्याचे बोलले जात होते. यावर बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, पंकजा मुंडे, एकनाथ खडसे यांची नाराजी आम्ही ऐकून घेतली आहे. ते दोघेही पक्ष सोडणार नाहीत, पक्ष सोडून जाण्याच्या बातम्या या मीडियाने तयार केल्या आहेत. पंकजा यांना भाजपचे बाळकडू घरातच मिळाले आहे, त्यामुळे पक्ष सोडून जाण्याचा प्रश्नच येत नाही असे पाटील म्हणाले.
हेही वाचा - वाढदिवसादिवशीच गळफास घेऊन तरुणाची आत्महत्या; कारण अस्पष्ट
पुढे बोलताना पाटील म्हणाले, १२ डिसेंबर ला गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त गोपीनाथ गडावर मी जात आहे. उद्याच पंकजा गोपीनाथ गडावर हिच बाब स्पष्ट करतील. त्यासोबतच नाथाभाऊ यांनीही पक्ष वाढवण्यात मोठं योगदान केले आहे. पक्षाला नुकसान होईल अशी कोणतीचे भूमिका नाथाभाऊ घेणार नाहीत आणि दोघेही पक्ष सोडणार नाहीत. मात्र, पंकजा मुंडे १२ डिसेंबर रोजी काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा - जपानी ऊस तोडणी यंत्र विघ्नहर कारखान्यात दाखल; तोडणीचा वेग वाढणार