पुणे : आम्ही जसे खेळाडू वृत्तीने सर्व विषय घेतो. तसेच उद्धव ठाकरेंनी आणि विरोधकांनी घेतले पाहिजेत. असे चंद्रकांत पाटील म्हणाले. यावेळी उदाहरण देताना ते असे म्हणाले की फक्त उद्धव ठाकरेच नाही. तर विरोधी पक्ष हिमाचलमध्ये काँग्रेसचा विजय होतो. तेव्हा वोट काऊंटींग मशीन बरोबर असते. गुजरातमध्ये 156 जागा आले की ईव्हीएम मशीन मध्ये प्रॉब्लेम असतो. मध्यप्रदेशमध्ये सरकार आमचे आहे. परंतु अगोदर त्यांचे होते. न्यायालयाचा निर्णय त्यांच्या बाजूने असले की न्यायालय चांगले असते.हे लोकशाहीत बरोबर नाही.
लोकांनी राग व्यक्त केला : सत्ता गेल्यापासून उद्धव ठाकरे किर किर करत आहेत का ते मला कळत नाही. असे म्हणत चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केलेली आहे. देशात लोकशाही राहिली नाही हे मोदींनी लाल किल्ल्यावरून जाहीर करावा असे उद्धव ठाकरे म्हणले होते. त्यावर, बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत की कोणी काय म्हणाव हे आपल्या लोकशाहीची सुंदरता आहे. त्यामुळे त्यांना काय म्हणायचे ते म्हणू द्या. न्यायालयावर तुम्ही अविश्वास व्यक्त करता याचा अर्थ तुम्ही बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेवरच अविश्वास व्यक्त करत आहात. त्यामुळे तुमच्या मनासारखे चालणार नाही. हम बोले सो कायदा महाराष्ट्रात चालणार नाही. असे सुद्धा चंद्रकांत दादा पाटील म्हणाले आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणावर काय परिणाम होईल हे बघत राहू.
या निर्णयाने विजय आणखी ताकदवान : आधीच कसब्यात विजय निश्चित झाला होता. या निर्णयाने आणखी ताकदवान झाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दोनदा कामाख्या देवीला जाऊन आले आहेत. त्यांना प्रसन्न झाले का असा प्रश्न विचारला असता जर कामख्या देवी प्रसन्न होत असेल तर उद्धव ठाकरेंनी सुद्धा कामाख्या देवीला गेले पाहिजे, असे चंद्रकांत पाटील यावेळी म्हणाले आहेत. तसेच शिवसेनेच्या या पूर्ण रसाला कोण जबाबदार आहे, हे इतक्या कठोरपणे मी सगळ्यासमोर सांगणार नाही असे म्हणे त्याने उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे.
सुडाचे राजकारण : सुडाचे राजकारण कोणी केले. हे 33 महिन्याच्या महाविकास आघाडी सरकारकडे बघितल्यानंतर कळते. ज्यावेळेस बारा आमदार निलंबित झाले, त्यावेळेस आमची काही चूक नव्हती. मला, देवेंद्र फडणवीस यांना आशिष शेलार यांना विनाकारण तुम्ही निलंबित केले. ते सुडाचे राजकारण आहे, सर्व कायद्याने चालेल असे म्हणत त्यांनी विरोधकांवर जोरदार टीका केलेली आहे. जनता 33 महिने सुडाच्या राजकारणाची सत्ता विसरलेली नाही. एक साधी पोस्ट टाकली तरी, एका अभिनेत्रीला तुम्ही एका पोलीस स्टेशनवरून त्या पोलीस स्टेशनला पुढच्या पोलीस स्टेशनला नेता. कंगना राणावतच्या बाबतीत ही असेच केले. तिचे घर पाडले. आम्ही 33 महिने तेच चालू दिले नाही. रोज रस्त्यावर उतरलो. त्यामुळे जनता ठरवेल असे सुद्धा चंद्रकांत दादा पाटील म्हणाले आहेत.